JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / रोज खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे, कोलेस्ट्रॉल आणि वजनही होईल कमी

रोज खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे, कोलेस्ट्रॉल आणि वजनही होईल कमी

खजूर नियमीत खाण्याचे अनेक फायदे (Benefits) आहेत. वजन कमी करण्याबरोबर रक्त वाढून हाडं मजबूत होतात.

0110

ड्रायफ्रुट आणि फळांमध्ये आढळणाऱ्या अनेक गुणधर्मांचा साठा एकट्या खजुरात (Dates) असतो. 2 ते 3 खजुर नियमीत खाण्याने (Daily Eating) अनेक फायदे (Benefits) मिळतात.

जाहिरात
0210

खजुरातले गुणधर्म आपल्या शरीरात आवश्यक असणारी पोषक तत्व पोहचवण्यात महत्वाचं काम करतात. त्यामुळे आरोग्यविषयी समस्या कमी होऊन, आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते.

जाहिरात
0310

डायटिंग करणाऱ्यांनी खजूर नक्की खावेत. त्यातील फायबरमुळे पोट भरतं आणि यातील फ्रुक्टोज आणि ग्लूकोज आपल्या शरीराची उर्जा वाढवण्यास मदत करतात.

जाहिरात
0410

खजूराने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत करतं. खजुरामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं. जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.

जाहिरात
0510

त्यातील अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करतात. ज्यामुळे प्लाग भरण्याची शक्यता कमी होते. त्यातील मॅग्नेशियम आपलं हृदय आणि रक्तवाहिन्यांचे स्नायू रिलॅक्स ठेवतं.

जाहिरात
0610

खजूरातील कॅल्शियम,मॅग्नेशिय,सेलेनियम,कॉपर आणि मॅंग्नीज सारख्या पौष्टिक घटकांमुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. हाडं आणि स्नायूंच्या दुखण्यापासून देखील खजुर खाल्ल्याने आराम मिळतो.

जाहिरात
0710

याव्यतिरिक्त,यात असलेलं व्हिटॅमिन-के रक्त दाट करण्यास मदत करतं. डायटींग करताना खजुर खाल्ल्यास शरीराला उर्जा मिळून अशक्तपणा आणि थकवा जाणवत नाही.

जाहिरात
0810

खजुराने इम्यूनिटी वाढते. शरीर स्वस्थ राहतं आणि वारंवार रोग आजार होत नाहीत. याव्यतिरिक्त स्नायूही बळकट होतात. यातील अ‍ॅन्टीबॅक्टीरियल गुणधर्म आणि पोषक घटक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

जाहिरात
0910

खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पाचनक्रिया चांगली होते. अपचन आणि गॅस, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन होण्याचीही शक्यता संपते.

जाहिरात
1010

हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत होते. त्यातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक रक्तदाब नियंत्रित करतात. जे दररोज खजुर खातात. त्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या