JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / स्तनपानातील अडचणी होतील दूर; ‘लॅक्टेशन मसाज’ आईसाठी आहे फायदेशीर

स्तनपानातील अडचणी होतील दूर; ‘लॅक्टेशन मसाज’ आईसाठी आहे फायदेशीर

लॅक्टेशन मसाजमुळे (Lactation Massage) दूध कमी येणे किंवा ब्रेस्टफीडिंगशी (Breasfeeding) संबंधित समस्या दूर होतात.

019

बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा मुख्य आहार हे आईचं दूध असतं. आईचे दूध पचायला हलकं आणि तितकाच पोषक असतं. स्तनपान हे बाळाच्या निरोगी आणि सुदृढ आयुष्यासाठी महत्त्वाचं असतं. पहिले 6 महिने बाळाला केवळ आईचं स्तनपान योग्य मानलं जातं.

जाहिरात
029

स्तनपान बंद झाल्यानंतर महिलांना स्तनांमध्ये वेदना व्हायला सुरुवात होतात. स्तन लटकणं, कडक होणं,जड होणं, ताप येणं, निपलमधून दूध पाझरणे अशा समस्या यायला लागतात

जाहिरात
039

ब्रेस्ट फीडिंगमध्ये अडचणी येत असतील तर, त्यावर लॅक्टेशन मसाज हा एक उपाय आहे. लॅक्टेशन मसाजमुळे स्तनांच्या पेशी रिलॅक्स होता आणि ब्रेस्टफीडिंग संबंधित समस्या दूर होतात.

जाहिरात
049

लॅक्टेशन मसाज वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. पाठीवर झोपून कंबर थोडीशी वर उचला. शरीर पूर्णपणे सरळ ठेवा आणि रिलॅक्स पोझिशनमध्ये काही वेळ शांत पडून राहा.

जाहिरात
059

तेल किंवा क्रीमने सर्क्युलर मोशनमध्ये ब्रेस्टला मसाज करा. बोटांच्या सहाय्याने हलक्या हाताने थोपटा किंवा हलक्या हाताने मसाज करा.

जाहिरात
069

हात एकमेकांवर घासून स्तनांना उब द्या. यामुळे स्तनांमध्ये उष्णता निर्माण होईल. यासाठी गरम केलेल्या टॉवेलहा वापरू शकता. बाळाला दुध पाजण्याआधी आंघोळ करताना 30 ते 45 सेकंद स्तनांना मॉलिश करा.

जाहिरात
079

मसाज केल्यावर स्तनांमधून थोडसं दूध निघत असेल तर, थोडा वेळ थांबा दूध हळूहळू जास्त निघायला लागल्यानंतर स्ट्रोक कमी करा. रिलॅक्स वाटेपर्यंत स्तरांमधून दूध काढत रहा.

जाहिरात
089

स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये ब्रेस्‍ट इंगोर्जमेंट इंफेक्‍शनमुळे वेदना होत असतील तर,लॅक्टेशन मसाजमुळे कमी होतात. ब्रेस्टमध्ये दूध जास्त तयार होतं. दुधामध्ये लिपिड्स कॅसिन आणि एनर्जी वाढते आणि दुधाची क्वालिटी देखील सुधारते.

जाहिरात
099

30 सेकंदापेक्षा जास्त काळ स्तनांना हलक्या हाताने मॉलीश करण्याने कोलाजन आणि ब्लड फ्लो वाढतो. स्तनांवरील स्ट्रेच मार्क्स देखील हळूहळू कमी होतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या