JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / आजीच्या बटव्यातल्या पावडरचे इतके फायदे; सांधेदुखी, ब्लडशुगर, कोलेस्ट्रॉल करतं कमी

आजीच्या बटव्यातल्या पावडरचे इतके फायदे; सांधेदुखी, ब्लडशुगर, कोलेस्ट्रॉल करतं कमी

जेवणाची चव वाढवणारी ही पावडर वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी ही वापरता येऊ शकते.

0108

सुंठ खाण्याने वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. सुंठ म्हणजेच सुकलेलं आलं पचनशक्ती चांगली करून वजन कमी करायला मदत करतं. रक्तातली चरबी कमी करून रक्तामधील ग्लुकोजची पातळी नियंत्रीत ठेवण्यास मदत करतं.

जाहिरात
0208

जेवणामध्ये वापरल्यास लवकर भूक लागत नाही. त्यामुळे जेवण पचायला जास्त वेळ मिळतो. सुंठ पावडर पाण्यात किंवा दुधात मिसळून पिल्याने वजन कंट्रोलमध्ये राहतं.

जाहिरात
0308

बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्राइग्लिसराईड कमी करण्यास सुंठ मदत करते. एलडीएल लिपोप्रोटीन म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढल्यास हार्ट अटॅकची धोका वाढतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचा त्रास असणाऱ्यांनी नियमितपणे सुंठ पावडर खावी.

जाहिरात
0408

सुंठ पावडर पोटाचे विकार बरे करून पचशक्ती सुधारते. सुंठ पावडर खाण्याने पोट दुखी, अपचन असे त्रास कमी होतात. तसेच बद्धकोष्टचा त्रास असेल कर, त्यातून देखील सुटका होते.

जाहिरात
0508

पाळीच्या दिवसात पोट आणि कंबर दुखीचा त्रास असेल तर, सुंठ पावडरने फायदा होतो, सुठं पावडर मुळे अंगदुखीचा त्रासही कमी होतो. डिलिव्हरीनंतर महिलेचं शरीर आतून साफ होण्यासाठी महिलांना सुंठ पावडर खाण्यास दिली जाते.

जाहिरात
0608

महिलांना प्रेग्नेंसी दरम्यान होणाऱ्या उलट्यांसाठी किंवा मॉर्निंग सिकनेससाठी औषधी आहे. त्यासाठी कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर आणि मध मिसळून पिता येतं. मात्र, प्रेग्नेंसी दरम्यान हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा

जाहिरात
0708

ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी देखील सुंठ ओळखली जाते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि थोडीशी सुंठ पावडर मिसळून पिल्याने फायदा होतो.

जाहिरात
0808

मीठ आणि सुंठ एकत्र करून घेतल्यास शरीरावरची सुज कमी होते सांध्यांना आणि बोटांना सूज येत असेल तर, या मिश्रणाने फायदा मिळतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या