JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / YouTube वर पाहून किंवा सल्ले ऐकून त्वचेवर करू नका भलते प्रयोग; साइड इफेक्टमुळे व्हाल हैराण

YouTube वर पाहून किंवा सल्ले ऐकून त्वचेवर करू नका भलते प्रयोग; साइड इफेक्टमुळे व्हाल हैराण

इंटरनेटबरोबर पाहून किंवा इतर कोणाच्या सांगण्यावरून देखील आपण चांगल्या-वाईट परिणामाचा (Side Effect) विचार न करता काही होम रेमेडीज (Home Remedies) ट्राय करतो. त्याचे दुष्परिणाम चेहऱ्यावर भयंकर होतात.

019

आपण त्वचेवर सहजपणे घरगुती उपाय करतो किंवा इंटरनेटवरून माहिती घेऊन, व्हीडिओ बघून चेहऱ्यावर प्रयोग करतो. कधीकधी इंटरनेटवर मिळालेल्या माहितीमुळे आपण असे प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर लावतो की,ज्यामुळे आपल्या चेहऱ्याचं नुकसान होतं.

जाहिरात
029

काही महिलांना आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स फोडायची सवय असते. चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्समध्ये ब्लॅकहेड्स असतात. ते काढल्यावर पिंपल्स बऱ्या होतात. मात्र, यामुळे मोठी जखम होऊ शकते. म्हणून पिंपल्स फोडू नयेत.

जाहिरात
039

पिंपल्सवर उपाय म्हणून महिला टूथपेस्ट चेहऱ्याला लावतात. कधीकधी या असे व्हीडिओ इंटरनेटवर मिळतात. ते बघून चेहऱ्यावर टूथपेस्ट लावणं हा शुद्ध मूर्खपणा आहे.

जाहिरात
049

या पेस्टमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड असतं. टूथपेस्ट जास्त वेळा त्वचेवर लावल्यास त्याचे वाईट परिणाम देखील होऊ शकतात.

जाहिरात
059

भरपूर पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे आपल्या शरीर हायड्रेट होतं. आपली ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. मात्र पिंपल्स बऱ्या होण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी पाणी प्यावं मात्र, याचा पिंपल्सवर काही परिणाम होत नाही.

जाहिरात
069

चेहऱ्यावर एक्सफोलिएटरचा वापरणे फायदेशीर आहे. मात्र, सतत वापराने चेहऱ्याचं नुकसान होऊ शकतं. एक्सफोलिएटरचा वापर आठवड्यातून एकदाच करावा. याचा सतत वापर केलातर त्वचा सेन्सिटिव्ह होते. त्यामुळे त्वचेवर आणखीन पिंपल्स येऊ शकतात.

जाहिरात
079

बऱ्याच महिलांना वाटतं की क्लिंजीगसाठी चेहऱ्यावर नारळाचं तेल वापरता येऊ शकतं. काहीजण नारळाचे तेल मॉश्चरायझर म्हणूनही वापरतात. मात्र, तेलामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.

जाहिरात
089

नारळाच्या तेलामध्ये फॅटी ऍसिड भरपूर असतं. त्यामध्ये ऍन्टीबॅक्टेरियल आणि ऍन्टीइंफ्लेमेटरी गुण असतात. मात्र, दररोज त्याचा वापर करू नये.

जाहिरात
099

तेलकट त्वचेसाठी मॉश्चरायझर लावू नये या समजामुळे महिला चेहऱ्याला मॉश्चरायझर लावत नाहीत. पण, ऑयली त्वचासुद्धा हायड्रेट होते. त्यामुळे ऑयली त्वचेवर वॉटर बेस्ट मॉश्चरायझरचा वापर करू शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या