JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / स्ट्रेस फ्री जगायचंय? लवकर उठावं लागेल; ही 8 कारणं वाचाच

स्ट्रेस फ्री जगायचंय? लवकर उठावं लागेल; ही 8 कारणं वाचाच

बऱ्याचवेळा सकाळी (Morning) गाढ झोप लागते. पण, सकाळी उठण्याचे जास्त फायदे (Benefits) असतात.

0108

सकाळी उठण्याचे अनेक फायदे असतात. दिवसाची सुरुवात लवकर झाली की, कामं लवकर आटपतात. त्यामुळे याच वेळामधून वेळ काढून व्यायामाकडेही (Exercise) लक्ष देता येतं.

जाहिरात
0208

दररोज सकाळी उठल्यावर एक्‍सरसाइज (Exercise), योगा (Yoga), वॉकिंग (Walking) सारख्या गोष्टी करण्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं. तर, कोणतीही धावपळ न करता ऑफिस (Office)ची तयारी करता येते.

जाहिरात
0308

दिवसाचं प्लॅनिंग-दिवसभरात काय करायचं याचं योग्य प्लॅनिंग करत असाल तर, हिच वेळ चांगली असते, दिवसाचं प्लॅनिग सकाळीच करावं. त्यामुळे आत्मविश्वासही वाढतो. दिवसातला भरपूर वेळ मिळाल्याने कोणतंही काम निवांत करता येतं.

जाहिरात
0408

सकाळचा नाश्ता-सकाळी लवकर उठण्यामुळे तुम्हाला हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी वेळही मिळतो. त्यामुळे दिवसभरासाठी उर्जा मिळते. सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत नाश्ता टाळणारे लोक जे मिळेल ते खाऊन सकाळची भूक भागवतात. त्य़ामुळे आरोग्याचं नुकसान होतं.

जाहिरात
0508

तणावमुक्त दिवस-सकाळी उठल्यावर कोणतही काम करताना धावपळ होत नाही. त्यामुळे स्ट्रेस फ्री (Stress Free) राहता येतं. लवकर उठल्याने तुमच्याकडे बराच वेळ असल्याने शांत मनाने काम करता येतं.

जाहिरात
0608

रात्रीची झोप-लवकर उठणारे लवकर झोपतात. सकाळी उठण्याच्या सवयीमुळे,रात्रीही चांगली झोप येते.त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं.

जाहिरात
0708

सकारात्मक भावना-लवकर जागं होणं आपल्यात सकारात्मकतेची भावना जागवतं. एका संशोधनानुसार जे लोक लवकर उठतात ते आयुष्यभर आनंदी जगतात.

जाहिरात
0808

दररोज व्यायाम - सकाळी व्यायाम करणं सर्वोत्तम मानलं जातं,कारण यामुळे अ‍ॅड्रेनालाईन हार्मोन बूस्ट होतात ज्यामुळे झोप न होण्याची समस्या संपते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या