JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / ऑनलाईन अभ्यासामुळे डोळे होतील खराब; अशी घ्या मुलांची काळजी

ऑनलाईन अभ्यासामुळे डोळे होतील खराब; अशी घ्या मुलांची काळजी

मुलांना दररोज डोळ्यांच्या व्यायामाची सवय लावा. त्यामुळे मुलांचे डोळे नेहमी निरोगी राहतील.

0110

कोरोनाची अजून गेलेला नाही त्यामुळे मुलांच्या ऑनलाईन शाळा सुरू आहेत. त्यांचा जास्तीतजास्त वेळ घरी फोनवर किंवा लॅपटॉपवर जात आहे. त्यामुळे मुलांचे डोळे खराब होण्याची भीती पालकांच्या मनात निर्माण झाली आहे.

जाहिरात
0210

तज्ज्ञांच्यामते या काळात आपल्या मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. डोळे अतिशय नाजूक अवयव आहे. भविष्यातल्या नुकसानाचा विचार करता मुलांच्या डोळ्याची काळजी आजपासूनच घ्यायला हवी.

जाहिरात
0310

डोळ्यांचा कोणताही त्रास होत नसेल तरी, वर्षातून एकदातरी डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. मुलांचे डोळे दरवर्षी तपासले पाहिजेत.

जाहिरात
0410

कोरोनामुळे मुलांना बाहेर खेळण्यास परवानगी नसली तरी, आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस कमीतकमी थोड्या वेळासाठी तरी त्यांना बाहेर न्या. शक्य असल्यास,आपल्या कारमधून बाहेर घेऊन जा आणि एखाद्या मोकळ्या टेकडीवर, पटांगणावर घेऊन जा, थोडं खेळू द्या.

जाहिरात
0510

वाढत्या वयातील मुलांचा आहार पौष्टिक असायला हवा. आहाराची काळजी घेतली तर मुलं निरोगी राहतात, त्यांची दृष्टी देखील चांगली रहाते.

जाहिरात
0610

त्यांना दूध,मासे,अंडी,मांस,ड्रायफ्रुट,फळं,भाज्या खायला द्या. मुलांना सगळ्या भाज्या आणि फळं खायची सवय लावा.

जाहिरात
0710

मुलांचे डोळे नाजूक असतात. मुलाला डोळ्यांचा त्रास असेल तर, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसवर जास्त वेळ घालवणं त्याच्यासाठी खुपच हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे मुलांना थोड्याथोड्या वेळाने स्क्रिनवरून डोळे बाजूला घेण्याची सवय लावा.

जाहिरात
0810

जर मुलाला आधीच चष्मा लागलेला असेल तर, नियमितपणे लावणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे स्कीनकडे पाहताना डोळ्यांवर जास्त ताण येणार नाही आणि डोळे खराब होणार नाहीत.

जाहिरात
0910

मुलांना डोळे दुखणं किंवा ताण येणं असा त्रास असेल तर, पालक अनेकदा मुलांच्या डोळ्यांत आयड्रॉप टाकतात. मात्र हे चुकीचं आहे. कोणताही आयड्रॉप वापरताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जाहिरात
1010

डोळ्याचे व्यायाम नियमितपणे करणं खुप महत्वाचं आहे. मुलांना दररोज डोळ्यांच्या व्यायामाची सवय लावा. त्यामुळे मुलाचे डोळे नेहमी निरोगी राहतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या