3. ताक उन्हाळ्यात ताक शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ते आपल्या शरीराला आतून थंड करते. ताकाने पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासोबतच पोटातील उष्णताही कमी होते.
buttermilk benefits : शरीराचा थकवा कमी करण्यासाठी आणि स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी आपण अनेकदा एक ग्लास ताक (buttermilk) किंवा लस्सीचे (Lassi) सेवन करतो. अनेकजण हे दोन्ही पोषक घटक असलेली पेय पिण्यास प्राधान्य देतात. ताक आणि लस्सी दोन्ही प्रोबायोटिक्सने समृद्ध असतात जे पचन व्यवस्थित ठेवतात, तसेच आरोग्याची काळजी घेतात. या पेयांबाबत अनेकदा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो की दोनपैकी कोणते पेय वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे. ताकाचे आरोग्याला फायदे : ताक (buttermilk) केवळ पचन बरोबर ठेवत नाही तर शरीराला उष्णतेपासून आराम देते. आयुर्वेदानुसार ताक हे सात्विक अन्न आहे. जे आंबटपणा नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. जर तुम्ही जेवणात जास्त मसाले वापरत असाल तर अन्नाबरोबर ताक प्या, तुमचे पचन ठीक होईल. याचे सेवन केल्याने शरीराला कॅल्शियम मिळते, ते कोलेस्टेरॉल कमी करते. एवढेच नाही, ताक रक्तदाब नियंत्रित करते आणि कर्करोगासारख्या आजारांना प्रतिबंध करते. कमी कॅलरी ताक आपले वजन नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे वाचा - घरात भाऊ नसल्याचं पाहून साधला डाव; दीराने वहिनीची केलेली अवस्था पाहून हादराल! लस्सीचे आरोग्याला फायदे : लस्सी हा एक दही आधारित द्रव पदार्थ आहे. लस्सी पोषक तत्वांनी समृद्ध आहे. दह्यामध्ये थोडे मीठ किंवा साखर घालून बनवले जाते. चव वाढवण्यासाठी काही फळे, औषधी वनस्पती किंवा काही मसाले देखील लस्सीमध्ये घातले जातात. ते प्यायल्याने भूक शांत होते, तसेच पचनही ठीक होते. पोटाच्या समस्यांवर लस्सी हा उत्तम उपाय आहे. त्याच्या सेवनामुळे आतड्यात संसर्ग होत नाही, रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहते, तसेच हाडेही मजबूत राहतात. हे वाचा - ‘दोस्ती की है, निभानी तो पडेगी’ सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी असं का म्हणाली? वजन कमी करण्यासाठी ताक का लस्सी? वजन कमी करण्यासाठी ताक हा उत्तम पर्याय असल्याचे म्हटले जाते. हे आरोग्यासाठी एक हलके आणि अतिशय फायदेशीर द्रव आहे. ताक जीवनसत्त्वे आणि प्रोबायोटिक्सने समृद्ध आहे. ताक आपण दिवसातून अनेक ग्लास पिऊ शकता. ताकात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते, जे तुमचे वजन कमी करण्यास खूप मदत करते.