Immunity Booster Fruits: कोरोना विषाणूसोबतच ओमिक्रॉनचे रुग्णही वेगाने वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही जण औषधांचा आधार घेत आहेत, तर काही घरगुती उपाय करून पाहत आहेत. आज आपण काही हंगामी फळांबद्दल जाणून घेऊया, ज्यांचा रोजच्या आहारात समावेश करून तुम्ही शरीराची प्रतिकारशक्ती वाढवू शकता.
संत्री - हिवाळ्यात संत्री खाणे चवीसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. नियमित संत्री खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते.
सीताफळ - हिवाळ्याच्या मोसमात मिळणारे सीताफळ जेवढे चवीला जबरदस्त आहे. तेवढेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही फायदेशीर आहे. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.
पेरू - पेरू अनेकांचे आवडते फळ आहे. या फळाचा आस्वाद घेण्यासाठी अनेकजण हिवाळ्याची वाट पाहत असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच त्यामुळे पचन होण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
डाळिंब - डाळिंबाचे टपोरे दाणे पाहून ते खाल्ल्यावाचून राहवत नाही. हे चविष्ट फळ आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे एक उत्कृष्ट रक्त पातळ करणारे फळ आहे. रक्तदाबाच्या रुग्णांसाठी याचा विशेष फायदा होतो. हृदयाशी संबंधित समस्यांवरही हे फायदेशीर आहे.
मोसंबी - मोसंबी हे फळ विविध गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. संत्र्याप्रमाणेच यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. मोसंबीचा रस देखील फायदेशीर आहे. मोसंबीचा रस आजारी लोकांसाठी खूप फायदेशीर आहे.
आलुबुखार (Plum) - हिवाळ्यात येणारे प्लम हे फळ देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. या हंगामी फळाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
किवी (Kiwi) - किवी फळाची चव इतर फळांपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. हे फळ शरीरात रक्त गोठू देत नाही. किवी डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे.