आपल्या विद्यार्थिनीचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या शिक्षकाने 51 व्या वेळी देशातील सर्वोच्च शिखर सर केलं आहे.
आपल्या आयुष्यात आपली सर्वात पहिली गुरू आई. जी आपल्याला हाताचं बोट धरून चालायला शिकवते. त्यानंतर दुसरा गुरू म्हणजे शिक्षक जो आपल्याला आयुष्यात योग्य मार्ग दाखवून यशाच्या शिखरापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करतो. असाच एक शिक्षक ज्याने खऱ्या अर्थाने आपल्या विद्यार्थ्याला शिखरापर्यंत पोहोचवलं आहे.(फोटो सौजन्य - marios_giannakou/इन्स्टाग्राम)
ग्रीसमधील अॅथलीट मॅरोस गिआन्नाकोऊ (Marios Giannakou) यांनी आपल्या 22 वर्षीय दिव्यांग विद्यार्थिनी एलेफ्थेरिया तोसिऊला घेऊन देशातील सर्वात उंच Mount Olympus सर केलं आहे.(फोटो सौजन्य - marios_giannakou/इन्स्टाग्राम)
सप्टेंबर 2020 मध्ये मॅरोस पहिल्यांदा एलेफ्थेरियाला भेटले. ती बायोलॉजी स्टुडंट आहे. यावेळी एलेफ्थेरियाने आपल्याला Mount Olympus सर करण्याचं आपलं स्वप्न असल्याचं मॅरोस यांना सांगितलं.(फोटो सौजन्य - marios_giannakou/इन्स्टाग्राम)
आपल्या विद्यार्थिनीचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही आठवड्यातच मॅरोस यांनी ते प्रत्यक्षात साकारण्याचं ठरवलं. त्यांनी आपण एलेफ्थेरियाला आपल्या पाठीवर घेऊन Mount Olympus जाणार असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं. मॅरोस यांनी यासाठी एक खास बॅकपॅकही तयार करून घेतली.(फोटो सौजन्य - marios_giannakou/इन्स्टाग्राम)
मीडिया रिपोर्टनुसार, 5 ऑक्टोबर सकाळी 9 वाजून 02 मिनिटांनी दोघंही Mount Olympus चं सर्वात उंच शिखर Mount Mytikas वर पोहोचले. 2,918 मीटर उंचीवरील शिखर त्यांनी फक्त दहा तासांत सर केल्याचं सांगतिलं जातं आहे.(फोटो सौजन्य - marios_giannakou/इन्स्टाग्राम)
मॅरोस याआधी 50 वेळा Mount Olympus चढले होते. मात्र आपल्या विद्यार्थिनीसाठी त्यांनी 51 व्या वेळीदेखील हे आव्हान स्वीकारलं. या शिक्षकाचं सोशल मीडियावर कौतुक केलं जातं आहे. (फोटो सौजन्य - marios_giannakou/इन्स्टाग्राम)