गेल्या अनेक वर्षापासून ही अख्यायिका सांगितली जाते. कृष्णाचं हृदय पृथ्वीवर एका ठिकाणी सुरक्षित आहे. तुम्हाला माहिती आहे का ही कथा?
महाभारताचा काळ कौरवांच्या शेवटासाठी ओळखला जातो. पण, हाच काळ श्रीकृष्णाच्या शेवटाची सुरुवात होता. भगवद्गीते नुसार दुर्योधनच्या मृत्यूमुळे त्याची आई गांधारीने कृष्णाला मृत्यूचा शाप दिला होता. त्यामुळेच हजारो वर्षानंतरही कृष्णाचा हृदय आजही पृथ्वीवरती धडधडत आहे.
महाभारतातल्या युद्धाला 36 वर्षं झाल्यानंतर एका जंगलामध्ये श्रीकृष्ण झाडाखाली योग समाधी घेत असताना त्या ठिकाणी जरा नावाच्या शिकारी हरणाची शिकार करण्यासाठी पोहोचला. कृष्णाचे पाय पाहून तो त्याला हरीण समजला आणि त्याने बाण सोडला. लक्षात आल्यानंतर त्यांनी कृष्णाची क्षमा मागितली पण, त्या वेळी कृष्णाने सांगितलं की त्यांचा मृत्यू निश्चित होता.
त्रेतायुगात कृष्णाने रामाच्या रुपाने जन्म घेतला आणि सुग्रीवाच्या मोठ्या भावाचा वध केला होता. त्या जन्माची शिक्षा त्यांना पुढच्या जन्मामध्ये भोगावी लागली. खरंतर असं सांगितलं जातं की, जरा मागच्या जन्मीचा वाली होता. बाण लागल्यावर कृष्णाने आपल्या शरीराचा त्याग केला. कृष्णाच्या मृत्यूलाच कलियुगाची सुरवात मानली जाते.
अर्जुन द्वारकेला पोहोचल्यानंतर त्यांना कृष्ण आणि बलराम यांच्या मृत्युची वार्ता समजली. त्यामुळे त्यानेच त्यांच्यावर अंतिम संस्कार केले मात्र, कृष्ण आणि बलरामाचं शरीर जळाल्यानंतरही नंतरही कृष्णाचं दृदय जवळालं नव्हतं आणि त्यामुळेच आजही ते जळतं आहे असं म्हटलं जातं.
पांडवांनंतर द्वारका नगरी समुद्रामध्ये सामावली आणि भगवान कृष्णाचं हृदयही पाण्यामध्ये बुडालं असं सांगितलं जात. त्या पाण्यात कृष्णाचं हृदय मऊ लोखंडासारखं झालं.
अवंतिका नगरीचा राजा इंद्रद्युम्न विष्णुचे मोठे भक्त होते आणि त्यांच्या दर्शनाची त्यांना इच्छा होती. एका रात्री त्यांना विष्णूने स्वप्नामध्ये कृष्णाच्या रूपात दर्शन दिलं आणि त्यानंतर राजाने कृष्णाचा शोध सुरू केला. त्यांना कृष्णा सापडल्यानंतर त्याला आपल्यासोबत घेऊन आले आणि भगवान जगन्नाथाच्या मंदिराची स्थापना केली.
नदीमध्ये अंघोळ करत असतानाच राजा प्रद्युम्न यांना एक मुलायम पिंड सापडली. लोखंडाची असूनही ही पिंड पाण्यामध्ये तरंगत होती त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं. हातात घेतल्यावत त्यांच्या कानामध्ये विष्णूचा आवाज आवला. त्यावेळी विष्णूने राजा इंद्रद्युम्न यांना सांगितलं की हे माझं हृदय आहे आणि लोखंडच्या मुलायम रूपामध्ये नेहमीच जमिनीवरती धडधडत राहील.
त्यानंतर राजा इंद्रद्युम्न यांनी ते हृदय जगन्नाथ मंदिरामध्ये आणलं आणि मूर्तीजवळ ठेवलं. त्यानंतर या पिंडाला हात लावण्यास मनाई करण्यात आली, आजही कोणीही त्याला स्पर्श करू शकलेलं नाही.
काही मान्यतांनुसार श्री कृष्णाचं ते हृदय आजही जगन्नाथ मंदिरामध्ये आहे मात्र, हे हृदय अजूनही कोणीही पाहिलेलं नाही. केवळ नवकलेवरलाच 12 किंवा 19 वर्षांनी मूर्ती बदल्या जातात. त्या वेळेस पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. तेव्हाच पुजारी त्या पिंडाला स्पर्श करू शकतो.