मुंबई, 30 ऑगस्ट: अवघ्या मराठी जनांचा आवडता उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरगुती गणपतीच्या सजावटीचं काम सुरू केलं असेल. अजूनही महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचं सावट कायम आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेचे संकेत असल्यामुळे कोरोनाचे नियम पाळूनच गणपती उत्सव साजरा करावा लागणार आहे. अशा वेळी पटापट, कमीत कमी साहित्यात होणारी घरगुती गणपतीची सजावट कशी करायची याचे पर्याय आम्ही एकत्र करून देत आहोत. इंटरनेटवर अनेक वेबसाइट्स आणि VIDEOs गणपती सजावटीचे पर्याय देणारे आहेत. pinterest सारख्या साइट्सवरसुद्धा युजर्स खूप कलात्कम फोटो पोस्ट करतात. टाकाऊतून कला ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांच्या घरात हमखास अनेक पुठ्ठ्याचे खोके येतात. या टाकाऊ खोक्यापासून सुंदर कलात्मक मखर घरच्या घरी करता येईल. विकत घ्यायला गेलात तर याच असा मखरेसाठी 700 ते 900 रुपये मोजावे लागतात. हेच डेकोरेशन घरीसुद्धा करू शकाल. त्यातून बाप्पासाठी काही केल्याचं समाधान मिळेल. त्यासाठी हे VIDEO पाहा
इको फ्रेंडली गणपतीसाठी थर्मोकोल आणि प्लास्टिक या पर्यावरणाला घातक गोष्टींऐवजी कागदापासून किंवा रद्दीपासूनसुद्धा सुंदर सजावट करता येते. कागद, काड्या, पेपर कप अशा साहित्यापासून इको फ्रेंडली गणपती डेकोरेशनच्या आयडिया इथे दिसतील. कात्री, कागद, डिंक आणि पुठ्ठा अशा साध्या मोजक्या गोष्टींतून हे इको फ्रेंडली डेकोरेशन करता येईल.
कागदाची करामत साध्या संगीत कागदापासून घड्या घालून फुलं करा आणि त्यातून सुंदर सजावट कशी करायची याचे पर्याय पुणेकर स्नेहा या YouTube चॅनेलवर दिसतील. ओरिगामी
कुणालाही जमतील अशा सोप्या आणि फटाफट होणाऱ्या सजावटीचे पर्य़ाय या VIDEO मधून दिसतात.