JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / भय इथले संपत नाही! फक्त कोरोनाच नव्हे तर आणखी 5 आजारांचं थैमान, परिस्थिती गंभीर

भय इथले संपत नाही! फक्त कोरोनाच नव्हे तर आणखी 5 आजारांचं थैमान, परिस्थिती गंभीर

एकामागो माग एक आजाराची संकटं येतच आहेत.

0111

देशात कोरोनाचं संकट कमी की काय त्यात आता आणखी नवनव्या आजारांची भर पडत आहे. महिनाभरात एक-दोन नव्हे तर तब्बल आणखी 5 आजार समोर आले आहेत.

जाहिरात
0211

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस होत असल्याची बरीच प्रकरणं समोर आली आहेत. ज्याला ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणूनही ओळखलं जात आहे. महाराष्ट्रातही या आजाराचे अडीच हजारपेक्षा जास्त रुग्ण आहेत.

जाहिरात
0311

ब्लॅक फंगस हे जीवघेणं असं इन्फेक्शन आहे. याचा दुष्परिणाम जबडा, नाक, डोळा आणि मेंदूवरही होतो. त्यावेळी रुग्णाला वाचवण्यासाठी इन्फेक्शन झालेले अवयवही काढून टाकावे लागतात.

जाहिरात
0411

ब्लॅक फंगसप्रमाणे काही राज्यांमध्ये व्हाईट फंगसचेही (White Fungus) रुग्ण सापडले आहे. हा फंगस ब्लॅक फंगसपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जातं आहे.

जाहिरात
0511

व्हाईट फंगस रुग्णांच्या त्वचेर परिणाम करत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याचं निदान उशिरा झाल्यास रुग्णाचा मृत्यूही ओढावू शकतो.  कोरोनाचे रुग्ण आणि यातून बऱ्या झालेल्यांना व्हाईट फंगसला गांभीर्यानं घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.

जाहिरात
0611

यानंतर येलो फंगसचंही प्रकरण समोर आलं. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये यलो फंगसचं पहिलं प्रकरण दिसून आलं आहे.  45 वर्षांच्या व्यक्तीला यलो फंगसचा संसर्ग झाला आहे.

जाहिरात
0711

ब्लॅक, व्हाइटपेक्षाही यलो फंगस अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. यामध्ये जखम बरी होण्यास वेळ लागतो, असं डॉक्टरांनी सांगितलं. सामान्यपणे यलो फंगस सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळतं. पहिल्यांदाच मला हे माणसांमध्ये दिसून आलं आहे.

जाहिरात
0811

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये क्रिम फंगसचं (Cream Fungus) इन्फेक्शन झालं आहे. माहितीनुसार राज्यातील हे असं पहिलं प्रकरण आहे.

जाहिरात
0911

सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजच्या ईएनटी विभागात यारुग्णावर उपचार सुरू आहेत. ज्याला ब्लॅक फंगससह क्रिम फंगसही झालं आहे.

जाहिरात
1011

तर यानंतर गुजरातमध्ये एस्परगिलोसिस (Nasal Aspergillosis) नावाच्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढत आहे. वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात या नवीन बुरशीजन्य संसर्गाचे 8 रुग्ण आढळले आहेत.

जाहिरात
1111

सायनसमध्ये त्याचं संक्रमण होत असल्याने डॉक्टरही आश्चर्यचकित आहेत. सामान्यत: इम्युनो-कॉम्प्रोमाइज्ड झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतो, परंतु सायनसमध्ये एस्परगिलोसिस फारच कमी आढळतो, असं डॉक्टरांनी दिसलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या