JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / 1 मार्चपासून तुम्हालाही मिळणार CORONA VACCINE; लसीकरणासाठी अशी करा नोंदणी

1 मार्चपासून तुम्हालाही मिळणार CORONA VACCINE; लसीकरणासाठी अशी करा नोंदणी

कोरोना लस (Corona vaccination) घ्यायची असल्यास नेमकी प्रक्रिया काय आहे ती समजून घ्या.

0108

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे.  60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वयाच्या ज्यांना इतर आजार आहेत, अशा व्यक्तींचा या लसीकरणात समावेश आहे.

जाहिरात
0208

सरकारी आणि खासगी केंद्रांवर ही लस दिली जाईल. यासाठी 10,000 सरकारी आणि 20,000 खासगी केंद्रे आहेत. सरकारी केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रावर शुल्क घेऊन लस दिली जाईल.

जाहिरात
0308

सरसकट कोरोना लस दिली जाणार नाही तर यासाठी नोंदणी करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःदेखील एक मार्चपासून ऑनलाइन नोंदणी करू शकता. Co-Win अॅप 1 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. तोपर्यंत ऑफलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

जाहिरात
0408

को-विन (Co-Win), आरोग्य सेतू (Aarogya Setu) अॅप या मोबाइल अॅपच्या माध्यमातून किंवा cowin.gov.in या संकेतस्थळावरून तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करता येईल.

जाहिरात
0508

ऑनलाइन नोंदणी करताना सर्वात आधी तुमचा मोबाइल क्रमांक टाका. यानंतर तुम्हाला अकाऊंट तयार करण्यासाठी ओटीपी मिळेल. यानंतर तुमचं नाव, वय, लिंग आणि आवश्यक ओळखपत्रं अपलोड करा.

जाहिरात
0608

जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक नसाल पण तुमचं वय 45 पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला इतर आजार असेल तर तुम्हाला असलेल्या आजाराचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल.

जाहिरात
0708

तुम्हाला मोबाइल अॅप किंवा ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या सेवा केंद्रांवर जाऊन तिथं आपली नोंदणी करू शकता किंवा 1507 या क्रमांकावर कॉल करून नोंदणी करा.

जाहिरात
0808

जर यापैकी कुठेच तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं शक्य झालं नाही तर तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन तुम्हाला तिथं नोंदणी करता येईल. यावेळी तुम्हाला सोबत ओळखपत्र आणि वयाचा पुरावा सोबत न्यावा लागेल. 

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या