JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Online Video पाहून ब्युटी ट्रिटमेंट करणं पडलं महागात; इतक्या सुंदर चेहऱ्याची महिलेने अक्षरश: लावली वाट

Online Video पाहून ब्युटी ट्रिटमेंट करणं पडलं महागात; इतक्या सुंदर चेहऱ्याची महिलेने अक्षरश: लावली वाट

Online Video पाहून ब्युटी ट्रिटमेंट (Beauty treatment) घेणं या महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.

0108

आपण सुंदर आणि तरुण दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यासाठी त्या काय काय नाही करत. अनेकदा तर महिला तज्ज्ञांकडे जाऊन ब्युटी ट्रिटमेंट घेण्याऐवजी घरच्या घरीच उपाय करतात.

जाहिरात
0208

सध्या असाच ऑनलाईन व्हिडीओ पाहून ब्युटी ट्रिटमेंट घेणं ऑस्ट्रेलियातील एका सेलिब्रिटीला चांगलंच महागात पडलं आहे. त्यानंतर तिची अवस्था इतकी खराब झाली की तिला रुग्णालयातच दाखल करण्याची वेळ आली.

जाहिरात
0308

21 वर्षांची टिली विटफेल्ड असं या महिलेचं नाव आहे. टिलीने ऑस्ट्रेलियन बिग ब्रदरमध्ये काम केलं आहे. या शोमध्ये येण्याच्या दोन आठवड्यांआधी तिने एक व्हिडीओ पाहिला होता आणि त्याचे गंभीर परिणाम तिला जाणवले.

जाहिरात
0408

टिकटॉकवर एक ब्युटी व्हिडीेओ पाहून तिने स्वतःवर त्याचा प्रयोग केला आणि काही वेळातच टिलीचा चेहरा जळला. इतकंच नव्हे तर तिच्या डोळ्यांची दृष्टीही गेली. ती आंधळी झाली.

जाहिरात
0508

लोकांना जागरूक करण्यासाठी तिने आपला हा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने आपले काही फोटोही शेअर केले आहेत.

जाहिरात
0608

मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. कोणतीही ब्युटी प्रोसिझर करायची असेल तर त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. स्वतःच काहीही चेहऱ्यावर लावू नका, असं आवाहन तिने केलं आहे.

जाहिरात
0708

टिलीचे हे फोटो पाहूनच तुम्हाला धक्का बसला असेल. तिच्या चेहऱ्याची अवस्था भयंकर झाली आहे.

जाहिरात
0808

त्यामुळे तुम्हीसुद्धा सुंदर दिसण्याच्या नादात असे प्रयोग करू नका.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या