JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / 5 हजार रुपयांमध्ये पाहू शकता ही भन्नाट ठिकाणं

5 हजार रुपयांमध्ये पाहू शकता ही भन्नाट ठिकाणं

तुम्हालाही फिरायला भयंकर आवडतं.. पण महिना अखेरीस फारसे पैसे शिल्लक राहत नाही तर आता ही चिंताही मिटली.

0105

तुम्हाला फिरण्याची आवड आहे, पण खिसा भरलेला नाही. अशावेळी अनेकदा आपण आपल्या आवडीला मुरड घालतो. मात्र आता तुम्ही कमी पैशातही फिरण्याची आवड पूर्ण करू शकता. अशी 5 ठिकाणं आहेत जिथे तुम्ही फक्त 5 हजार रुपयांत आरामात फिरू शकता.

जाहिरात
0205

कमी किंमतीत सुंदर शहर पाहायचं असेल तर शिमला- कुफरी हे ठिकाण आवर्जुन पाहण्यासारखं आहे. इथे दोन दिवस आणि दोन रात्रीचं पॅकेज घेता येऊ शकतं. या टूर पॅकेजचा खर्च 5 हजारांपेक्षाही आतला आहे. इथे राहणं, खाणं- पिणं तसेच फिरणं हा सर्व खर्च पकडला तर 5 हजारांहून कमी किंमतीत तुम्ही शिमला फिरू शकता.

जाहिरात
0305

मध्य प्रदेश येथील पचमढी हे ठिकाणही लो- बजेटसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. इथेही परवडणाऱ्या दरात सहज हॉटेल उपलब्ध आहेत. तसेच खाणं- पिणं आणि फिरणंही होऊ शकतं.

जाहिरात
0405

हिमाचल प्रदेशमधील कसोलही कमी किंमतीत फिरण्यासाठी चांगलं ठिकाण आहे. चंदीगढ- मनालीच्यामध्ये हे हिल स्टेशन आहे. बॅचलर्ससाठी हे आवडीचं ठिकाण आहे. इथे तुम्हाला प्रती दिन 500 रुपये प्रमाणे हॉटेल उपलब्ध होतील. इथे तुम्ही ऑनलाइन बुकिंगही करू शकता. गोंधळापासून दूर तुम्ही इथे काही दिवस सहज राहू शकता.

जाहिरात
0505

लो- बजेटची जेव्हा चर्चा होते तेव्हा आपसूक राजस्थानचं नाव समोर येतं. कमी किंमतीत फिरण्यासाठी राजस्थानमधलं उत्तम ठिकाण म्हणजे जयपूर. जयपूरमध्ये 500 रुपये दिवसाप्रमाणे अनेक हॉटेल उपलब्ध आहेत. तसेच छोट्या हॉटेलमध्ये एका व्यक्तिचा जेवणाचा खर्च 100 ते 200 रुपयांमध्ये होतो. इथे फिरण्यासाठी तुम्ही सार्वजनिक वाहनांचा वापर करू शकता. हा खर्च ही 200 ते 300 रुपयांपर्यंत होईल. इथे अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत जी दिवसभर तुम्ही पाहू शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या