JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कोणत्याही सप्लिमेन्टची गरज पडणार नाही, ’या’ कारणांसाठी माहिलांनी रोज केळं खावंच

कोणत्याही सप्लिमेन्टची गरज पडणार नाही, ’या’ कारणांसाठी माहिलांनी रोज केळं खावंच

महिलांसाठी केळं वरदान आहे. कारणं केळं खाण्याने थकवा आणि स्ट्रेस असे त्रास दूर राहतात.

019

कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिला आपल्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात मात्र, पुरुषांच्या तुलनेत महिलांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. पाळीच्या चक्रामधून महिलांना दर महिन्याला जावं लागतं. शिवाय प्रेग्नेन्सीमुळे देखील महिलांच्या शरीरावर परिणाम होत असतो.

जाहिरात
029

महिलांनी दररोज 1 केळं खाल्लं तर, त्यांचे अनेक त्रास संपू शकतात. थकवा येण, अशक्तपणा वाटणं आणि स्ट्रेस या वरती केळं हे रामबाण औषध आहे.

जाहिरात
039

केळं इन्स्टंट एनर्जी बूस्टर आहे. त्यामुळे त्याला कम्प्लिट फूड मानलं जातं. केळं खाल्ल्यामुळे शरीरात ग्लुकोज लेव्हल वाढते आणि आपल्याला लगेचच उत्साही वाटायला लागतं.

जाहिरात
049

महिलांनी सकाळी केळं खाल्लं तर, त्यांना दिवसभर उत्साही वाटतं राहतं. यामुळे शरीराला पोषक घटक मिळतात.

जाहिरात
059

केळ्यामध्ये पोटॅशियम असतं. त्यामुळे तणाव कमी होतो पोटॅशियम आपल्या शरीरामध्ये तणाव निर्माण करणारे हार्मोन्स म्हणजेच कोर्टिसोल नियंत्रित करतं.

जाहिरात
069

यामुळे जेव्हाही तणाव वाटत असेल तेव्हा एक केळं खावं. केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स,पोटॅशियम,व्हिटॅमिन बी 6, प्री-बायोटिक फायबर आणि मॅग्नेशियम असतं. जे ब्‍लड शुग कंट्रोल करण्याबरोबर मूडही चांगला करतं.

जाहिरात
079

प्रेग्नेन्ट महिलांनी रोज 1 केळं खाणं आवश्यक आहे. यामध्ये फॉलिक ऍसिड असतं. ज्यामुळे नवीन पेशींची निर्मिती होत असते. याशिवाय गर्भाची वाढ चांगली होते. बाळामध्ये गर्भदोष राहण्याची भीती राहत नाही.

जाहिरात
089

महिलांमध्ये ॲनिमियाचा त्रास जास्त प्रमाणामध्ये असतो. दररोज 1 केळं खाण्यामुळे ॲनिमियामध्ये फायदा होतो. रक्त निर्मितीला चालना देतं.

जाहिरात
099

ज्या महिलांना मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी केळं खावं. खेळामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे डोकेदुखी कमी होते. डोकं दुखायला लागल्यानंतर महिलांनी केळं जरूर खावं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या