JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / त्वचेवर चट्टे उठून खाज येत असेल तर लगेच करा ‘ही’ टेस्ट; दुर्लक्ष केल्याने अवघडतील सांधे

त्वचेवर चट्टे उठून खाज येत असेल तर लगेच करा ‘ही’ टेस्ट; दुर्लक्ष केल्याने अवघडतील सांधे

शरीरात साखर वाढली तर, त्याची लक्षणं आधीच आपल्याला दिसायला लगतात. त्वचेवर चट्टे उठले तर, नेक्रोबिऑसिस लिपोडिका हे एक कारण असू शकतं.

0107

आजच्या काळात मधुमेह एक गंभीर समस्या बनली आहे. मधुमेह कधीच पूर्ण बरा करणं शक्य नाही पण, नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो.

जाहिरात
0207

डायबेटिज हा असा आजार आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. या एका आजाराने अवयावांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळेच त्याला सायलेंट किलर म्हटलं जातं.

जाहिरात
0307

डायबेटिज हा असा आजार आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. या एका आजाराने अवयावांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळेच त्याला सायलेंट किलर म्हटलं जातं.

जाहिरात
0407

कारण याची लक्षणं लवकर लक्षात येत नाहीत. लोक मधुमेहापासून बचावासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. लाईफस्‍टाईल बदलून आहारात बदल करून आणि मेडिकेशने डायबेटीस कंट्रोल करता येतो.

जाहिरात
0507

डायबेटीजच्या रुग्णांना औषधांबरोबर बरीच पथ्यही पाळावी लागतात. या रूग्णांना त्यांच्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातली साखर जास्त वाढल्यावर त्याचे परिणाम शरीरावर दिसायला लागतात. कधीकधी शरीराबरोबर त्वचेमध्ये हाणारे बदल देखील आपल्याला मधुमेहाचे संकेत देऊ शकता.

जाहिरात
0607

डायबेटिजच्या रुग्णांच्या बोटं आणि अंगठ्यांच्या मागच्या भागात वॅक्स सारखा पदार्थ जमायला लागतो. त्यामुळे बोट आखडतात आणि हालचालही करता येत नाही. यालाच डिजिटल स्क्लेरॉसिस म्हणतात. हा एक त्वचा विकार आहे. कधीकधी पूर्ण हाताची त्वाचा जाड होते. हाताबरोबर पाठीचा वरचा भाग, खांदे आणि मानेवर हा त्रास होतो.

जाहिरात
0707

सुरवातीला त्वचेवर पुरळ येतं. हळूहळू त्यावर सुज येऊन कडक व्हायला लागून मोठे डाग तयार होतात. पिवळे, लाल तपकिरी रंगाचे डाग येतात. यावर खाज येणं आणि वेदना येतात. त्याला नेक्रोबिऑसिस लिपोडिका असं म्हणतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या