JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / व्यायाम करणाऱ्यांनो करू नका ही चूक! एनर्जी बूस्टर म्हणून दूध- केळं एकत्र घेत असाल तर आधी वाचा..

व्यायाम करणाऱ्यांनो करू नका ही चूक! एनर्जी बूस्टर म्हणून दूध- केळं एकत्र घेत असाल तर आधी वाचा..

दूध आणि केळं एकत्र घेत असाल तर आधी दुष्परिणाम जाणून घ्या. केळ्याचं शिकरण कितीही आवडीने खात असलात तरी डॉक्टरांच्या मते हे दोन्ही पदार्थ खाताना त्यामध्ये अंतर असायला हवं.

019

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन आणि पोषक घटक असतात. केळ्यात फायबर असतं शिवाय शरीराला एनर्जी मिळते आणि अनेक आजारांपासून संरक्षण होतं. दुधामध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी असतं. हे दोन्हीही पदार्थ आरोग्यदायी असले तरी, सकाळच्या नाश्त्यामध्ये केळं आणि दूध एकत्र घेत असाल तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.

जाहिरात
029

बऱ्याच जणांना दूध आणि केळं स्मूदी बनवून पिण्याची सवय असते. तर, काही पदार्थ करताना त्यात केळं आणि दुध वापरलं जातं. केळं आणि दूध आरोग्यासाठी उत्तम असलं तरी, एकत्र खाणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं तज्ञांचे मत आहे.

जाहिरात
039

दुधात प्रोटीन, व्हिटॅमिन्स, रायबोफ्लेविंन, व्हिटॅमिन बी 12 सारखे मिनरल्स असतात. एक ग्लास दुधामध्ये जवळपास 42 कॅलरीज असतात.

जाहिरात
049

केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 6, मॅग्नीज व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, बायोटीन सारखे व्हिटॅमिन असतात. 100 ग्रॅम वजनाच्या केळ्याच्या तुकड्यांमध्ये 89 कॅलरीज असतात. केळ खाल्ल्यामुळे पोट भरतं आणि एनर्जी मिळते. त्यामुळेच स्पोर्ट्समन आणि वर्कआऊट करणारे लोक खेळ खातात.

जाहिरात
059

काही लोक वजन वाढण्यासाठी दूध आणि केळाची स्मूदी पितात मात्र, हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. दोघांमध्ये वेगवेगळे घटक असल्यामुळे शरीरामध्ये एकत्र पचण्यासाठी कठीण ठरतात.

जाहिरात
069

एका संशोधनानुसार केळं आणि दूध एकत्र घेतल्यामुळे पचन व्यवस्थेवर वाईट परिणाम होतो. याशिवाय सर्दी, खोकला किंवा ऍलर्जी सारखे त्रास होऊ शकता. उलटी आणि लूज मोशन्स देखील होऊ शकतात.

जाहिरात
079

आयुर्वेदानुसार फळांसोबत कोणतेही द्रवपदार्थ घेऊ नयेत असा सल्ला देण्यात आलेला आहे. आयुर्वेदानुसार केळं आणि दूध शरीरामध्ये टॉक्सिफिकेशन वाढवतं. यामुळे इतर शारीरिक क्रियांवर देखील परिणाम होतो.

जाहिरात
089

केळं आणि दूध एकत्र घेतल्यामुळे शरीर जड वाटू लागतं. मेंदूवरही परिणाम होतो. उत्साह वाटत नाही, थकवा येतो.

जाहिरात
099

दूध आणि केळ कधी एकत्र खाऊ नये वर्कआउटनंतर केळ खायची सवय असेल तर, त्यासोबत दूध पित असाल तर, आधी दूध पिऊन 20 मिनिटानंतर केळं खावं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या