जेवल्यावरही वारंवार भूक लागत असेल तर, चुकीचा आहार, अपूरी झोप या सारख्या बऱ्याच गोष्टी त्याचं कारण असू असतात.
झोप येणं भूक लागणं या दोन्ही नैसर्गिक क्रिया आहेत. आपल्या शरीराला जेव्हा अन्नाची गरज असते तेव्हा, आपल्याला भूक लागते. भूक लागल्यामुळे पोट तशी जाणीव करून देतं. काहींना डोकेदुखी होते, काही लोकांची चिडचिड होते याबरोबर काही लोकांना जेवल्यानंतर पुन्हा एकदा भूक लागण्याचीही सवय असते. हे नमकं कशामुळे होतं याची कारणं नेमकी लक्षात येत नाही.
भुकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये प्रोटीनयुक्त आहार घ्यायला हवा. प्रोटीनमुळे भुक लागण्याचे किंवा पोट भरण्याचे संकेत देणारे हार्मोन्स तयार होतात. शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असेल तर सारखी भूक लागायला लागते. त्यामुळे मटण, चिकन, मासे आणि अंडी सारखे प्रोटीन असलेले पदार्थ खाल्ल्याने फायदा होऊ शकतो.
अपूरी झोप देखील भूक लागण्याचं कारण असू शकते. चांगली झोप घेतल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते. झोपेचा संबंध पचनसंस्थेशी असतो. पूर्ण झोपेमुळे भूक लागण्याचे संकेत देणारे हार्मोन कंट्रोलमध्ये राहतात पण अपूऱ्या झोपेमुळे हेच हार्मोन वाढायला लागतात आणि सारखी भूक लागते.
रिफाइंड कार्बोहायड्रेडवर जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेली असते. यामध्ये फायबर व्हिटॅमिन आणि मिनरल्स कमी असतात. मैद्यापासून तयार झालेले ब्रेड, पास्ता यामध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट वापरलेले असतात. सोडा, चॉकलेट, बेक्ड पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट यामध्ये प्रोसेस शुगर वापरली जाते. प्रोसेसर शुगर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट आरोग्याला हानिकारक असतात. यामध्ये फायबर नसल्यामुळे लवकर पचतात आणि पुन्हा भूक लागते.
पोट भरलेलं राहण्यासाठी फॅटयुक्त आहार घ्यायला हवा. फॅट असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं. ज्यांच्या आहारामध्ये फॅट कमी असतं त्यांना लवकर भूक लागायला लागते. त्यामुळे फॅटी फिश, कोकोनट ऑइल, अक्रोड आणि फूल फॅट असलेले दही खायला सुरुवात करावी.
शरीर चांगलं राहण्यासाठी हायड्रेशन आवश्यक आहे. पाणी पिण्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. पाण्यामुळे मेंदू, हृदय, त्वचा आणि पचन संस्था देखील चांगली राहते. पाणी पोट भरण्याचं काम करतं. जेवणाआधी पाणी पिण्यामुळे भूक कमी लागते. तर, कमी पाणी पिणाऱ्या लोकांना जास्त भूक लागते.
शरीरात फायबर कमी झाल्यामुळे लवकर भूक लागायला लागते. फायबरयुक्त आहार घेतल्यामुळे भूक नियंत्रणात राहते. पोट लवकर रिकामं होत नाही. फायबर हळूहळू पचतं. फायबरयुक्त पदार्थ भूक कमी करणारे हार्मोन्स तयार करतात. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्यासाठी फ्लॅक्ससीड, रताळं, संत्र, ड्रायफ्रूट्स आणि भात खावा.
बिझी लाइफस्टाइलमुळे लोकांना आपल्या आहाराकडे लक्ष देता येत नाही. भरभर वेगाने खाण्यामुळे देखील त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. घाईगडबडीत, धावपळीत खाल्ल्यामुळे पोट भरलं की नाही हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे आहाराकडे जास्त लक्ष न देणाऱ्या लोकांना ना देखील सतत भूक लागत राहते.
व्यायाम केल्यामुळे शरीरातील कॅलरीज कमी होतात. जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांचं मेटाबॉलिजम वेगाने कमी होतं. एक्ससाइजमध्ये एनर्जी लागते आणि यामुळेच भूक देखील लवकर लागायला लागते. एक्ससाइज करत असाल तर, आहारामध्ये फायबर, प्रोटीन आणि हेल्दी फायबर घ्यायला हवं.
जास्त मद्यपान करण्यामुळे भूक कमी करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. मद्यपान करणाऱ्या लोकांना लवकर भूक लागते. जे लोक जास्त प्रमाणामध्ये मद्यपान करतात ते इतरांच्या तुलनेत 30 टक्के जास्त कॅलरी घेतात.