लहान मुलांच्या नाजूक डोळ्यांमध्ये काजळ घालणं अयोग्य असल्याचं पिडियाट्रिशन आणि डॉक्टरांचं मत आहे. उलट डॉक्टरांच्यामते डोळ्यात काजळ घालण्याने त्यांच्या डोळ्यांचं नुकसान होतं.
काजळ बनवण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये लीडचा वापर केला जातो. लीड आरोग्यासाठी हानिकारक आहे. शरीरामध्ये लीड्चं प्रमाण वाढलं तर, बाळ कोमामध्ये जाऊ शकत.
आजही भारतात बऱ्याच कुटुंबांमध्ये लहान बाळांना दृष्ट लागू नये यासाठी काजळ लावलं जातं. पण, एका संशोधनानुसार काजळ लहान मुलांसाठी एखाद्या विषाप्रमाणे काम करू शकतं. लहान मुलांमध्ये हायर गट ऑब्झर्वेशन असतं आणि लहान वयात त्यांची नर्वस सिस्टिम विकास होत असते. त्यामुळे काजळातील लीड विषारी ठरू शकते.
काजळ बनवण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये लीडचा वापर केला जातो. लीड आरोग्यासाठी हानिकारक आहे. किडनी, मेंदू आणि शरीराच्या इतर भागावर याचा वाईट परिणाम होतो.
शरीरामध्ये लीड्चं प्रमाण वाढलं तर, व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते. इतकंच नाही तर, मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळेच लहान बाळांच्या शरीरामध्ये लिड गेलं तर त्यांच्यावरही वाईट परिणाम होण्याची भीती असते.
घरी बनवलेलं काजळ देखील लहान मुलांसाठी सुरक्षित नसतं. यामधील कार्बन लहान मुलांच्या डोळ्यांना नुकसानदायक ठरतं. शिवाय काजळ लावताना बोटाचा वापर केला जातो. ज्यामुळे डोळ्यात इन्फेक्शन होऊ शकतं.
लहान मुलांच्या डोळ्यामध्ये काजळ घातलं तर, त्यांचे डोळे आणि पापण्या मोठ्या होतात असा एक समज आहे. हा समज अतिशय चुकीचा आहे.
काजळ लावल्याने लहान मुलं जास्त वेळ झोपतात असं म्हणतात. मात्र, संशोधनानुसार लहान मुलं दिवसभरात 18 ते 19 तास झोपतच हे सिद्ध झालं आहे.
घरी बनवलेलं काजळ मुलांसाठी चांगलं असतं असा एक समज आहे. मात्र घरी बनवलेल्या काजळामध्ये कार्बन असतं त्यामुळे डोळ्यांचं नुकसान होतं
काजळ लावल्यामुळे मुलांना वाईट नजर लागत नाही किंवा दृष्ट पडत नाही मात्र, याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कोणताही आधार नाही.