JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / तिखटपणामुळे खाणं टाळू नका! झणझणीत मिरचीचेही आहेत आरोग्यासाठी फायदे

तिखटपणामुळे खाणं टाळू नका! झणझणीत मिरचीचेही आहेत आरोग्यासाठी फायदे

छोटीशी हिरव्या मिरची (Green Chilly) भाजीची चव दुप्पट करते. पण, हिरवी मिरचीची खासियत तिची झणझणीत चव नाही. तर, तिच्यापासून मिळणारं पोषण(Nutrition)देखील महत्वाचं आहे.

019

मिरची शरीर निरोगी ठेवते. यात कॅलरी नसतात. हिरव्या मिरच्या नियमित खाल्ल्याने मेटाबॉलिजम सुधारतं.

जाहिरात
029

हिरव्या मिरच्यांमध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट्स भरपूर असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हिरव्या मिरच्या खाल्याने प्रोस्टेट संबंधित आजार होण्याची शक्यता देखील कमी होते.

जाहिरात
039

हिरव्या मिरच्या खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित होतं आणि रक्ताभिसरण सहजतेने होतं. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.

जाहिरात
049

हिरव्या मिरच्यांमधे कॅप्सॅसिन नावाचा घटक असतो. यामुळे त्या तिखट वाटतात. त्या हायपॉथालेमस नावाच्या मेंदूच्या एका भागावर परिणाम करुन शरीराचं तापमान कमी करतात. यामुळेच उष्ण ठिकाणी हिरव्या मिरच्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या जातात.

जाहिरात
059

हिरव्या मिरच्यांमध्ये आढळणारे कॅप्सॅसीन रक्ताभिसरण संतुलित करतं, यामुळे सर्दी आणि सायनसच्या संसर्गाचा धोका कमी होतो. सर्दी असल्यास हिरवी मिरची खावी.

जाहिरात
069

हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरात वाढलेल्या उष्णता त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी होतात. अल्सरचा त्रस्त असलेल्या लोकांना तिखट खाणं अवघड असतं. पण, हिरव्या मिरच्यांमुळे त्रास कमी होतो.

जाहिरात
079

व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन असल्याने हिरव्या मिरच्या डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. हिरवी मिरची थंड आणि काळोख्या ठिकाणी ठेवावी. हवा आणि प्रकाशामुळे त्यातील जीवनसत्व नष्ट होतात.

जाहिरात
089

हिरवी मिरची रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करते. म्हणूनच, मधुमेह असलेल्या लोकांनी ताबडतोब आपल्या आहारात हिरव्या मिरच्यांचा समावेश करावा.

जाहिरात
099

हिरव्या मिरच्यांमध्ये आयर्न जास्त प्रमाणात आढळतं. म्हणून हिरव्या खाल्ल्या पाहिजेत. हिरव्या मिरच्या खाल्ल्याने ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका कमी होतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या