JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कसा ओळखाल चांगला आंबा? जाणून घ्या काही सोप्या ट्रिक्स

कसा ओळखाल चांगला आंबा? जाणून घ्या काही सोप्या ट्रिक्स

Varieties Of Mangoes : आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात आंब्यांच्या 1500 प्रजाती उबलब्ध आहेत. पण, उन्हाळ्यात (Summer) बाजारात (Market) येणारा नेमका आंबा (Mango) कोणता आणि तो कसा ओळखायची याची माहिती कित्येकदा नसते.

019

हापूस आंबा-इंग्रजीत अल्फांन्सो नाव असलेला हा आंबा महाराष्ट्रात येतो. याची जव जेवढी मधूर असते तेवढाच याचा सुगंधही सुंदर असतो. जगभरात या आंब्याला मागणी आहे.

जाहिरात
029

दशहरी आंबा-दशहरी आंबा उत्तर प्रदेशमध्ये येतो. दशहरी नावाच्या गावामुळे या आंब्याला हे नाव पडलं. उत्तर प्रदेशमध्ये हा आंबा जास्त खाल्ला जातो. मलिहाबादी दशहरी आंबा जगभरात निर्यात केला जातो.

जाहिरात
039

चौसा आंबा-बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये या आंबा आवडीने खाल्ला जातो. उत्तर प्रदेशातील हरदोईचा चौसा आंबा प्रसिद्ध आहे. भडक पिवळ्या रंगाचा हा आंबा त्याच्या रंगामुळे लवकर ओळखला जातो.

जाहिरात
049

तोतापूरी आंबा-या आंब्याचा आकार पोपटाच्या चोची प्रमाणे असतो. त्यामुळे याला तोतापूरी हे नाव पडलं आहे. दक्षिण भारतीतल कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणात याचं उत्पादन होतं.

जाहिरात
059

हिमसागर आंबा-पश्चिम बंगाल आणि ओडिशाचा हा आंबा आहे. हा आंबा चवीला गोड असतो तर,त्याचा आकारही लहान असतो. पिकल्यानंतरही तो बाहेरून हिरवा दिसतो.

जाहिरात
069

सिंधुरा आंबा-आंबट-गोड चवीच्या या आंब्याची चव जास्तकाळ जीभेवर राहते.याचा गर पिवळ्या रंगाचा असतो,तर बाहेरुन लाल दिसतो.

जाहिरात
079

लंगडा आंबा-हा आंबा उत्तर प्रदेशच्या काशी आणि वाराणसीमध्ये येतो. जुन ते जुलै महिन्यात बाजारात येतो. हिरव्या आणि पिवळ्या रंगाचा हा आंबा असतो.

जाहिरात
089

रसपूरी आंबा-कर्नाटकच्या ओल्ड म्हैसूरचा हा आंबा महाराणी आंबा म्हणून ओळखला जातो. मे ते जून या 2 महिन्यात बाजारात येतो. याचा आकार अंडाकृती असतो.

जाहिरात
099

बायगनपल्‍ली आंबा-हा आंबा हापूस आंब्यासारखा दिसतो. त्यामुळे त्याला हापूसचा जुळा भाऊ म्हटलं जातं. आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्याच्या बांगनापल्लीमध्ये याचं उत्पादन होतं. हा आंबाही अंडाकृती दिसतो पण, या आंब्यावर छोटे डाग असतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या