JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Diwali 2020: दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं नव्हे, हिरा करा खरेदी; 2000 रुपयातही मिळते डायमंड ज्युलरी

Diwali 2020: दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं नव्हे, हिरा करा खरेदी; 2000 रुपयातही मिळते डायमंड ज्युलरी

धनत्रयोदशी (Dhanteras puja) आणि पाडव्याच्या मुहू्र्तावर नागरिकांनी सोन्याबरोबर हिऱ्याचे दागिनेही खरेदी करावेत यासाठी अनेक ज्वेलर्स विविध ऑफर्स देत आहेत. डायमंड ज्युलरीची सुरुवात 1,999 रुपयांपासून मिळू शकते. पाहा काय आहेत ऑफर्स..

0105

हिऱ्याचे दागिने म्हणजे महाग. न परवडणारे असं अजूनही भारतीयांना वाटतं आणि सोन्याचं प्रेम काही कमी होत नाही. पण या वेळी हिऱ्याच्या किमती सोन्याएवढ्याच झाल्या आहेत.

जाहिरात
0205

जेम अँड ज्‍वेलरी एक्‍सपोर्ट काउंसिलचे चेअरमन कोलिन शाह यांनी सांगितले कोरोना संकट आणि आर्थिक संकट असताना देखील डायमंडच्या दागिन्यांची मागणी वाढत आहे. यावेळी नागरिक 10 हजार ते 20 हजार रुपयांच्या रेंजमधील दागिन्यांची खरेदी करण्याची अपेक्षा आहे.

जाहिरात
0305

चेअरमन कोलिन शाह यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या या संकटामुळे या वर्षी खर्च कमी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक सोन्यामध्ये आणि हिऱ्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्याचबरोबर नवरात्री आणि दुर्गा पूजेदरम्यान वाढलेल्या विक्रीमुळे बाजारात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे दिवाळी आणि धनत्रयोदशीला विक्री वाढण्याची अपेक्षा आहे

जाहिरात
0405

मुंबईच्या डब्लू एच.पी ज्वेलर्सचे डायरेक्टर आदित्य पेठे यांच्या मतानुसार, कोरोनानंतर सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात भाववाढ झाल्यामुळे सोन्यात गुंतवणूक करत आहेत. कोरोनामुळे नागरिकांनी लग्नदेखील डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यामुळे लग्नासाठी आणि दिवाळीसाठी एकत्रितच सोनंखरेदी केली जात आहे. त्यामुळे काही डायमंड दागिने विक्रेत्यांनी हफ्त्यांची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.

जाहिरात
0505

सेनको गोल्ड अँड डायमंड्सने आधीच इंटरेस्ट-फ्री ईएमआयचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या दागिन्यांच्या किमती 1,999 रुपयांपासून सुरु होत आहेत. त्याचबरोबर या दागिन्यांच्या खरेदीवर मोफत इंश्युरन्सदेखील मिळत आहे. याविषयी बोलताना सेनको गोल्ड अँड डायमंड्सचे सीईओ सुवांकर सेन यांनी म्हटले, सुलभ हफ्त्यांसाठी ग्राहकांकडून झिरो इंटरेस्ट आणि झिरो प्रोसेसिंग फी आकारली जाणार आहे. आरबीआयच्या नियमांनुसार सुलभ हफ्त्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या