JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / चहा अतिप्रमाणात उकळू नका; या 7 पद्धतीने तयार करा Healthy Tea

चहा अतिप्रमाणात उकळू नका; या 7 पद्धतीने तयार करा Healthy Tea

चहा बनवण्याची पद्धत आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. त्यामुळे योग्य पद्धतीने चहा तयार करायला हवा.

019

दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीने होते किंवा संध्याकाळी देखील फ्रेश वाटण्यासाठी आपण कॉफी किंवा चहा पितो. मात्र अतिप्रमाणामध्ये चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे.

जाहिरात
029

याशिवाय चहा बनवण्याची पद्धत देखील आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. त्यामुळे योग्य पद्धतीने चहा तयार करायला हवा. असा चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. पाहूयात चहा बनवण्याची योग्य पद्धत.

जाहिरात
039

साखर कमी प्रमाणात वापरा- चहामध्ये जास्त प्रमाणात साखर वापरण्याची सवय बऱ्याच जणांना असते. मात्र, कमीत कमी साखर घालून चहा करणं आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. याशिवाय शक्यतो बिनसाखरेचा चहा पिणं किंवा साखरेऐवजी गुळाचा वापर करणं उत्तम मानलं जातं.

जाहिरात
049

चहा जास्त उकळू नका- जास्त प्रमाणामध्ये उकळलेला चहा पिण्याने ऍसिडिटी वाढते. चहा उकळल्यानंतर त्यामध्ये मध किंवा साखर घालावी.

जाहिरात
059

चांगल्या क्वालिटीची चहा पावडर- चहा पावडर खरेदी करताना ती चांगल्या क्वालिटीची असल्याची खात्री करून घ्या. यामुळे चहाची टेस्टही वाढेल शिवाय जास्त उकळवावा लागणार नाही.

जाहिरात
069

कमी प्रमाणात दूध वापरा- चहामध्ये दूध कमी प्रमाणामध्ये वापरावं. याशिवाय पॅकिंग दूध वापरताना काळजी घ्यावी. दूध पावडर वापरण्याऐवजी दुधाचा चहा करावा.

जाहिरात
079

चहा मसाला वापरा- चहा मसाला घातलेला चहा पिणं देखील फायदेशीर असतं. चहा मसालामध्ये लवंग, दालचिनी, सुंठ, गूळ, वेलची, केसर अशा प्रकारच्या औषधी वनस्पती वापरलेल्या असतात.

जाहिरात
089

तुळस घातलेला चह- चहामध्ये कॅफिन असल्यामुळे ॲसिडिटी वाढते. याशिवाय झोपही कमी होते. कॅफीनचा प्रभाव कमी करण्यासाठी चहामध्ये तुळशीचा वापर करावा.

जाहिरात
099

रिकाम्या पोटी चहा नको- रिकाम्या पोटी चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. बऱ्याच जणांना सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याची सवय असते ही सवय बंद करावी.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या