JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Work from home करताना काळजी घ्या, नाहीतर उद्भवेल 'ही' समस्या

Work from home करताना काळजी घ्या, नाहीतर उद्भवेल 'ही' समस्या

कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) अनेक जण work from home करत आहेत. अशा वेळी अनेकांना पाठदुखीची समस्या बळावते.

0106

घरी जेव्हा आपण काम करतो, तेव्हा अनेकदा आपण आपल्या सोयीनुसार कसंही बसून काम करतो, शिवाय अशा अनेक चुका करतो ज्यामुळे शारीरिक वेदना उद्बवतात. विशेषत: पाठदुखी आणि कंबरदुखी.

जाहिरात
0206

ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमची शारीरिक स्थिती. घरी असल्यावर अनेक जण बेडवर झोपून किंवा आडवं पडून काम करत असाल तर त्यामुळे कमरेत वेदना होतील.

जाहिरात
0306

बसण्यासाठी योग्य उंचीचं टेबल आणि खुर्चीची व्यवस्था करावी. अगदी कमी किंवा अगदी जास्त उंचीची खुर्ची टेबलामुळेदेखील पाठीच्या समस्या उद्बवतील.

जाहिरात
0406

ऑफिसमध्ये असताना आपण छोट्या छोट्या कामांसाठी, जेवणाठी, चहा पिण्यासाठी एका जागेवरून उठतो, हालचाल करतो. मात्र घरी शरीराची अशी हालचाल होत नाही. त्यामुळे प्रत्येकी 30 मिनिटांनी 3 मिनिटांचा ब्रेक घ्यायला हवा. खुर्चीवरून उठून आजूबाजूला थोडं चाला, शरीर स्ट्रेच करा.

जाहिरात
0506

बहुतेक लोकं ऑफिसमध्ये भरपूर पाणी पितात मात्र घरी तितकं पाणी पित नाही. पाणी कमी प्यायल्यानंदेखील डोकेदुखी, कंबरदुखी, पाठदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे घरातून काम करताना सोबत पाण्याची बाटली ठेवा. पाणी पित राहा. यामुळे ऊर्जाही मिळते.

जाहिरात
0606

घरात असताना आपली शारीरिक हालचाल होत नाही. त्यामुळे किमान 30 मिनिटं तरी व्यायाम करायला हवा. यामुळे हाडंही निरोगी राहतील आणि शारीरिक वेदना बळावणार नाहीत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या