JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सावधान! कोरोना निदानासाठी CT-SCAN करताय? AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितला काय आहे धोका

सावधान! कोरोना निदानासाठी CT-SCAN करताय? AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितला काय आहे धोका

कोरोनाची लक्षणं (Coronavirus) असूनही RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर CT-SCAN करण्याकडे लोकांचा कल आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 मे : कोरोनाची दुसरी लाट, त्यात कोरोनाची बदलती रूपं आणि आता तर कोरोनाव्हायरस (Coronavirus) आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्टलाही चकवा देत असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाव्हायरसचं आरटी-पीसीआर टेस्टमध्येही निदान न झाल्याची काही प्रकरणं दिसून आली. आरटी-पीसीआर टेस्टऐवजी सिटी स्कॅनमध्ये अशा रुग्णांना कोरोना असल्याचं निदान होत असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर अनेक जण सीटी स्कॅन (CT-SCAN) करून घेत आहेत. पण सिटी स्कॅन करणं महागात पडू शकतं, असा इशारा एम्सच्या डॉक्टरांनी दिला आहे. कोरोनाच्या निदानासाठी सिटी स्कॅनचा वापर विचारपूर्वकच करावा, असा सल्ला एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी दिला ाहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सिटी स्कॅनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं, “सौम्य लक्षणं असतील तर सिटी स्कॅन करण्याचा काहीच फायदा नाही.   एक सिटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे इतकं असतं आणि हे खूप हानिकारक आहे” हे वाचा -  महाराष्ट्राबाबत टेन्शन थोडं कमी; केंद्रीय मंत्रालयाने दिली महत्त्वाची बातमी सौम्य लक्षणं असलेले रुग्ण कोणत्याही औषधांशिवाय बरे होऊ शकतात. पण मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांना स्टेरॉईड घेण्याची गरज आहे. पण तेसुद्धा डॉक्टरांच्या सल्लानुसारच घ्यावं, असंही डॉ. गुलेरिया म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या