JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / देशात नव्या कोरोना रुग्णांचा आकडा घटला; पण महाराष्ट्राला दिलासा नाहीच

देशात नव्या कोरोना रुग्णांचा आकडा घटला; पण महाराष्ट्राला दिलासा नाहीच

देशातील कोरोनाची (coronavirus in india) परिस्थिती नियंत्रणात आहे, पण महाराष्ट्रासमोर (coronavirus in maharashtra) आव्हान कायम आहे.

0105

देशात सध्या एकूण 1.07 कोटी कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 1.73 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 1.53 लाख कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण गेल्या चार महिन्यांपासून देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटते आहे. देशातील हे चित्र खूपच दिलासादायक आहे.

जाहिरात
0205

दररोज नव्यानं होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी लक्षणीयरित्या कमी झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दररोज 90 हजारांच्या आसपास, ऑक्टोबरमध्ये 50 हजारांच्या आसपास, तर डिसेंबरमध्ये 24 हजारांच्या आसपास नवे रुग्ण होते. 28 जानेवारी, 2021 च्या आकडेवारीनुसार फक्त 11,666 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

जाहिरात
0305

देशासाठी दिलासादायक चित्र असलं तरी महाराष्ट्राची चिंता मात्र कायम आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये आहेत. उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी  40,000 पेक्षा जास्त म्हणजे जवळपास 67 टक्के प्रकरण या दोन राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात 44,624 तर केरळमध्ये  72,476 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

जाहिरात
0405

लसीकरणाबाबतही महाराष्ट्र पिछाडीवरच आहे. भारतात 16 जानेवारी, 2021 पासून लसीकरण मोहीम सुरू झाली. 26 जानेवारी 2021 पर्यंत  2.03 दशलक्ष लोकांचं लसीकरण झालं आहे. दिवसेंदिवस लस घेणाऱ्यांचा आकडाही वाढता आहे.

जाहिरात
0505

महाराष्ट्रात मात्र लसीकरणात फारशी प्रगती नाही. सर्वात कमी लसीकरण झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील लसीकरणाची प्रगती फरक्त 20.7 टक्के आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या