JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या सुपर हिरोंनी स्वत:सह कुटुंबाला व्हायरसपासून कसं वाचवावं?

कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या सुपर हिरोंनी स्वत:सह कुटुंबाला व्हायरसपासून कसं वाचवावं?

कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धोका टाळण्यासाठी लॉकडाऊन असलं, तरी पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. मात्र यामुळे त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे या सर्वांनी स्वतचा आणि कुटुंबाचा व्हायरपासून कसा बचाव करावा हे पाहुयात.

0107

चपला शक्यतो घराबाहेर काढाव्यात, या चपला ठेवण्यासाठी एक विशिष्ट जागा असावी.

जाहिरात
0207

घरातील कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. अगदी डोअरबेल वाजवतानाही अवश्य ती काळजी घ्या. उघड्या हाताने डोअरबेल वाजवू नका.चावी, पर्स, बॅग अशा तुमच्याजवळ ज्या काही वस्तू असतील, त्यांना इतर कुणी हात लावणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी ठेवा.

जाहिरात
0307

मोबाइलला सॅनिटाइझ करून घ्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा.

जाहिरात
0407

तुम्ही घातलेले कपडे थेट वॉशिंग मशीनमध्ये टाका किंवा वेगळ्या बॅगेत ठेवा. लहान मुलं या कपड्यांना हात लावणार नाही, याची खबरदारी घ्या.

जाहिरात
0507

तुम्ही फळं-भाज्या आणल्या असतील तर ती नीट धुवून घ्या. इतर सामानही सॅनिटाइझ करून घ्या.

जाहिरात
0607

हे सर्व करताना तुम्ही ग्लोव्ह्ज घातले तर उत्तमच आहे. काम झाल्यानंतर हे ग्लोव्हज काढून टाका आणि कुणाच्या हाती लागणार नाहीत, याची काळजी घ्या.

जाहिरात
0707

यानंतर हात पाणी आणि साबणाने स्वच्छ धुवून घ्या. शक्य असल्यास अंघोळ करणंही चांगलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या