प्रेग्नन्सीचं निदान झाल्यानंतर कधीही कोरोना लस (Corona vaccination in pregnancy) घेता येऊ शकते.
भारतात आता प्रेग्नंट महिलांनाही कोरोना लस दिली जाणार आहे. गर्भवती महिलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रेग्नंट महिलांना कोरोना लस घ्यायची असल्यास त्यांना कोविन (CoWIN) पोर्टलवर नोंदणी करावी. किंवा त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून लस घेण्याचा पर्यायही त्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुपने (NTAGI) दिलेल्या माहितीनुसार प्रेग्नंट महिला आणि तिच्या बाळासाठीही कोरोना लस सुरक्षित आहे.
उलट कोरोना लशीमुळे आईच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाल्यास ती त्याच्या गर्भालाही मिळू शकते.