JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कोरोना, ब्युबोनिक प्लेग आणि आता SFTS Virus चं संकट; लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

कोरोना, ब्युबोनिक प्लेग आणि आता SFTS Virus चं संकट; लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

चीनमध्ये या व्हायरसमुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 60 जण संक्रमित झालेत.

019

जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे, अशात आता आणखी इतर व्हायरस डोकं वर काढत आहेत. चीनमध्ये कोरोनानंतर ब्युबोनिक प्लेग आणि आता एसएफटीएस व्हायरसचं संकट ओढावलं आहे.

जाहिरात
029

चीनमध्ये एसएफटीएस व्हायरसमुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 जणांना या व्हायरसची लागण झाली आहे.

जाहिरात
039

एसएफटीएस हा व्हायरस नवा नाही. याआधी चीनमध्ये 2010 साली या व्हायरसचे रुग्ण सापडले. त्यानंतर दक्षिण कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि तैवानमध्ये या आजाराचे रुग्ण दिसून आले आहेत.

जाहिरात
049

SFTS (Severe fever with thrombocytopenia syndrome) याला Tick Borne डिजीजदेखील म्हटलं जातं.

जाहिरात
059

Haemaphysalis longicornis ज्याला एशियन टिक (Asian tick) असंही म्हटलं जातं. प्राण्यांच्या शरीरावर चिकटणाऱ्या या किटकामार्फत माणसांमध्ये हा आजार पसरतो.

जाहिरात
069

या व्हायरसमुळे प्राण्यांचा मृत्यू होण्याचा दर कमी आहे. मात्र माणसांमध्ये जास्त म्हणजे जवळपास 30 टक्क्यांपर्यंत दिसून आला आहे. सध्या चीनमध्ये या व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 10-16% दरम्यान आहे.

जाहिरात
079

सुरुवातीला खोकला,  तीव्र ताप ही सुरुवातीची लक्षणं आहेत. याशिवाय अन्न न पचणं, उलटी, जंत, स्नायूंमध्ये वेदना अशा समस्या दिसू लागतात. तसंच शरीरातील प्लेटलेट कमी होतात (thrombocytopenia), पांढऱ्या रक्तपेशीही कमी होतात (leukocytopenia).

जाहिरात
089

ग्रामीण भागात मार्च ते नोव्हेंबरपर्यंत हा आजार पसरल्याची नोंद आहे. एप्रिल आणि जुलैमध्ये याची जास्त प्रकरणं दिसून येतात.

जाहिरात
099

माणसांमार्फत माणसांमध्ये हा व्हायरस पसरण्याची शक्यताही व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या