कोरोना प़ॉझिटिव्ह मातांनी बाळाला दूध पाजताना काय खबरदारी घ्यावी?
आईचं दूध म्हणजे बाळासाठी रोग प्रतिकारक शक्ती देतं. त्यामुळे बाळासाठी आईचं दूध खूप महत्त्वाचं आहे. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची असताना अनेक बाळांना आईचं दूध मिळत नाही आहे.
एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल तर तिला आयोसोलेट केलं जातं. ती व्यक्ती बरी होईपर्यंत तिच्या संपर्कात कुणी येत नाही. अशाच जर ती व्यक्ती बाळाला दूध पाजणारी आई असेल, तर मग बाळाला दूध पाजणं अशक्य होतं.
पण कोरोनासारखी लक्षणं असतील किंवा कोरोना असेल आणि आईला आपल्या बाळाला दूध पाजायचं असेल तर ती आवश्यक ती खबरदारी घेऊन आपल्या बाळाला दूध पाजू शकते.
कोरोना पॉझिटिव्ह आईने बाळाला दूध पाजताना काय काळजी घ्यावी याबाबत जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारनेही गाइडलाइन्स जारी केलेल्या आहेत.
जर कोरोनामुळे किंवा त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आई आपल्या बाळाला दूध पाजू शकत नसेल, तर बाळाला दुसऱ्या आईचं दूध द्यावं.