JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / सलमानची पहिली मराठमोळी नायिका पन्नाशीत, फिटनेसच्या बाबतीत आजच्या अभिनेत्रींनाही देते टक्कर

सलमानची पहिली मराठमोळी नायिका पन्नाशीत, फिटनेसच्या बाबतीत आजच्या अभिनेत्रींनाही देते टक्कर

1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या’ मैने प्यार किया’ या चित्रपटातून सलमान खानसोबत नायिका म्हणून झळकलेली मराठमोळी अभिनेत्री आठवतेय ना? संस्थानिकांच्या घरातली ही अभिनेत्री सध्या काय करते?

0107

1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातून सलमान खान सोबत नायिका म्हणून झळकलेली मराठमोळी अभिनेत्री 'भाग्यश्री ' आजही अतिशय तरुण आणि सुंदर दिसते.

जाहिरात
0207

वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री आजच्या बॉलिवूड अभिनेत्रीं इतकीच फिट आणि स्टायलिश दिसते.

जाहिरात
0307

भाग्यश्री ही महाराष्ट्रीय आहे. तिचं आडनाव पटवर्धन. तिचा जन्म 1969 मध्ये सांगली जिल्ह्यातल्या मिरजेत झाला. ती सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांच्या कुटुंबातील आहे. आता बरखास्त झालेल्या सांगली संस्थानचे राजे श्रीमंत विजयसिंहराव माधवराव पटवर्धन हे तिचे वडील आहेत.

जाहिरात
0407

भाग्यश्री सर्वप्रथम दूरदर्शनवरील 'कच्ची धूप' या मालिकेत झळकली होती. अमोल पालेकर यांनी त्या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं.

जाहिरात
0507

भाग्यश्रीने हिमालय दासानीशी विवाह केला आणि लग्नानंतर तिने सर्व दिग्दर्शकांना आपल्या चित्रपटात आपला नायक पतीच असावा अशी अट ठेवली होती.

जाहिरात
0607

पण भाग्यश्रीची अट काही दिग्दर्शकांनी मान्य केली नाही. त्यानंतर ती 2001 मध्ये 'हेलो गर्ल्स' या चित्रपटात दिसून आली होती. तसंच भाग्यश्रीने टीव्ही मालिका' लौट आओ त्रिशा' या मालिकेतही काम केलं आहे.

जाहिरात
0707

भाग्यश्री सतत सोशल मीडियावर आपल्या मुलासोबत आणि पतीसोबत फोटो पोस्ट करत असते. आणि चाहत्यांकडून भाग्यश्रीच्या सौंदर्याचं आणि फिटनेसचं कौतुकही होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या