बिग बॉस (Bigg Boss) चे वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम (swami om) यांचं निधन झालं आहे. त्यांच्या वर्तणुकीमुळे बिग बॉसनंही त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवला होता.
इतकंच नव्हे तर घरातील इतर सदस्यांवर त्यांनी आपलं युरिनही फेकलं होतं. युरिन फेकल्यानंतर बिग बॉसनं स्वामी ओमला घराबाहेर काढलं होतं.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना स्वामी ओम यांनी बिग बॉसलादेखील धमकी दिली होती. बिग बॉसनं पुन्हा घरी बोलावलं नाही तर फिनाले होऊ देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली होती.
स्वामी ओम यांचा अश्लील व्हिडीओही व्हायरल झाला होता. यामध्ये स्वामी एका बिकिनी घातलेल्या मुलीसोबत होते.