मुंबई, 27 मे : रोज सकाळी केळी खाणं ही अनेकांच्या आयुष्याचा एक भागच असतो. केळं खाल्ल्यानं एनर्जी येते. पण केळं खाण्याचीही योग्य पद्धत आहे. ती तुम्ही आत्मसात केलीत तर आरोग्यावर चांगला परिणाम होतो. पण चुकीच्या पद्धतीनं केळं खाल्लत तर अपाय होऊ शकतो. केळ, दूध आणि मध आरोग्यासाठी चांगला पर्याय आहे. पण रिकाम्या पोटी कधी केळं खाऊ नका. केळ्याबरोबर सुका मेवा, स्ट्राॅबेरी, सफरचंद यांचाही समावेश असू द्या. नाही तर शरीरात अॅसिड तत्त्व जास्त होतील. यामुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशयमची लेव्हल बिघडू शकते. रिझल्टच्या आदल्या दिवशी ‘असे’ राहा टेन्शन फ्री केळं खाण्याच्या आधी काही तरी जरुर खा. कारण नुसतं केळं खाल्ल्यानं भुकेची जाणीव होत नाही आणि ते शरीरासाठी घातक असतं. रात्री केळं खाऊ नका. त्यानं पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो. शिवाय खोकलाही होऊ शकतो. आयुर्वेदाप्रमाणे केळं सकाळी न्याहरीनंतर खा. म्हणजे 8 ते 9च्या मधे खा. ते तुमच्या आरोग्याला फायदेशीर असतं. केळं खाण्याआधी नाश्ता पूर्ण व्हायला हवा. वजन कमी करायचंय? मग भरपूर खा भात केळ्यातील पोटॅशियम ब्लड सर्क्यूलेशनमध्ये मदत करतं. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास होत नाही. तर ट्रायप्टोफॅन अॅमिनो अॅसिड आपल्या शरीरात सेरेटोनिन हार्मोन तयार करतं. ज्यामुळे आपला मूड दिवसभर चांगला राहतो आणि कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही. नियमित केळ्याचं सेवन हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर असतं. केळ्यात प्रोबायोटिक तत्व असतं. जे आपल्या आहारातील कॅल्शियम शोषतं आणि आणि आपल्या हाडांना पुरवतं ज्यामुळे आपली हाडं मजबूत होतात. बारावीनंतर पुढे काय? तज्ज्ञांनी दाखवलेले काही वेगळे करिअर मार्ग रोज एक केळं खाल्ल्यानं शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. म्हणून अॅनिमियाच्या रुग्णांनी केळं जरुर खावं. याशिवाय नियमित केळं खाल्ल्यानं आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. VIDEO शेगावमध्ये CCTV मध्ये दिसलेली ‘ती’ धडकी भरवणारी आकृती नेमकी कशाची?