JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / मायग्रेनचा त्रास घालवण्यासाठी करा ‘ही’ योगमुद्रा; कोणत्याही वेळी करू शकता ध्यान

मायग्रेनचा त्रास घालवण्यासाठी करा ‘ही’ योगमुद्रा; कोणत्याही वेळी करू शकता ध्यान

प्राचीन काळापासून योगाभ्यासाचं महत्व सर्वांना माहित आहे. आताच्या बदलेल्या लाईफस्टाईल मध्ये तर, स्वत:साठी थोडातरी वेळ काढून योगा करायला हवा. योगाने शरीर आतमधूनही सुदृढ राहतं.

019

मोबाईल किंवा कंमप्युटर वर काम केल्यामुळे होणारी डोकेदुखी आत नेहमीची गोष्ट झालेली आहे. कधीकधी जास्त विचार केल्यानेही डोक्यावर ताण येतो. डोकेदुखी झाल्यावर आपण गोळ्या औषधं घेतो. पण, त्यामुळे तात्पुरता आराम मिळतो. महाशीर्ष मुद्रा केल्याने या त्रासांमधून सुटका होते.

जाहिरात
029

त्यामुळे मन शांत राहण्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, अनेक दुखणी बरी करण्यासाठी योगा करण्याचा सल्ला दिला जातो. डोकेदुखी चा त्रास असलेल्यांनाही योगा केल्याने फायदा मिळू शकतो.

जाहिरात
039

महाशीर्ष मुद्रा हा एक प्रकारचा योगाभ्यास आहे. महाशीर्ष मुद्रा केल्याने डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. सायनस आणि मायग्रेन सारख्या आजारातही फायदा होतो. मणक्याच्या आजारातही फायदा होतो. मानदुखणे, पाठणदुखणे आणि कंबरेच्या दुखण्यातही आराम मिळतो. महाशीर्ष मुद्रा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ यात.

जाहिरात
049

महाशीर्ष मुद्रा करण्यासाठी सर्वात आधी एका जागेवर शांत बसा. आपले खांदे सैल सोडा. आता दोन्ही हाताचे अंगठे, मधले बोट आणि त्याच्या बाजूचं बोट यांना एकत्र जोडा. करंगळी,अनामिका आणि हात ताठ ठेवा. हळूहळू शांतपणे श्वासोच्छवास करत रहा. या पद्धतीने महाशीर्ष मुद्रेचा अभ्यास केल्यास फायदा मिळतो.

जाहिरात
059

मायग्रेनचा त्रास हाऊ नये यासाठी महाशीर्ष मुद्रा करावी. यासाठी काही वेळ ध्यान करावं. त्यामुळे आपला श्वास, तोंड आणि त्याच्या जवळच्या नसा शांत होतात. त्यामुळे मायग्रेन लवकर बरा होतो. 5 ते 10 मिनीटं याच अवस्तेत बसल्याने तीव्र डोकेदुखीतही आराम मिळतो.

जाहिरात
069

सतत स्क्रिनकडे पाहत राहिल्याने डोळे कमजोर होतात. अशावेळी महाशीर्ष मुद्रा केल्याने डोळ्यांना तात्काळ फायदा होतो. काहीकाळा डोळे बंद ठेवल्याने डोक्यातले अनेक विचार कमी होतात आणि डोळेही शांत होतात. शांत झोपही लागतं.

जाहिरात
079

आजच्या धावपळीच्या काळात ताण येणं नॉर्मल झालेलं आहे. त्यामुळेच आपलं नुकसानही होतं. भारतात 10 व्यक्तीमध्ये 7 जणाना तणावाची समस्या असल्याचं एका संशोधनात पुढे आलेलं आहे.

जाहिरात
089

त्यामुळे स्ट्रेसपासून सुटका होण्यासाठी महाशीर्ष मुद्रा काही मिनटं करावी. त्याने आपलं मानसिक आणि शारीरिक त्रास थांबतात. मन शांत आणि प्रसन्न होतं.

जाहिरात
099

सायनसचा त्रास बरा करण्यासाठी महाशीर्ष मुद्रा फायदेशीर आहे. सायनसच्या आजारात नाकला गंभीर स्वरुपात संक्रमण झालेलं असतं. सायनसमध्ये नाकाच्या आजूबाजूच्या भागातील छोट्याछोट्या पोकळ्यांमध्ये सूज येते. सायनसचा त्रास असणाऱ्यांनी दररोज महाशीर्ष मुद्रा करावी.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या