नवी दिल्ली, 21 जुलै : महिलांना अंगावार जास्त केस असतील तर, आवडते ड्रेस घालता येत नाहीत. त्यामुळे वॅक्स (Wax) करावं लागत.पण, सध्याच्या कोरोनाच्या (Corona) काळात ब्युटिपार्लरमध्ये (Beauty Parlor) जायलाही भीती वाटते. तर, काही महिलांना ब्युटिपार्लरमध्ये किंवा काही प्रकारच्या क्रिम वापरून वॅक्स केल्याने रॅशेस (Rashes) होतात. शिवाय विचित्र प्रकारची खाज येते. काहींना वॅक्स वापरायचं नसतं. अशावेळेस काही सोप्या घरगुती उपायांचा (Home Remedies) वापर तुम्ही करु शकता. लिंबू साखर साखर एक प्रकारचं एक्सफोलिएटर आहे. साखरेचा पाक केसांना चिकटतो. तर, लिंबू त्वचेला नैसर्गिकरित्या ब्लिच करतं. हे मिश्रण आपण _वॅक्सिंग_साठी वापरू शकता. यासाठी 2 चमचे लिंबाच्या रसात 1 चमचा साखर मिसळा आणि त्यात 8 ते 9 थेंब पाणी घाला. ( तुम्ही मासे खात नाहीत? मग ही बातमी वाचाच, अन्यथा… ) हे मिश्रण गॅसवर गरम करा आणि ते थंड झाल्यावर शरीरावरच्या केसांना लावा आणि 20 ते 25 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. ( डोळ्यात काजळ घालण्याने होतात वाईट परिणाम; बाळ कोमातही जाऊ शकतं ) मध आणि लिंबू वॅक्सिंगसाठी मध आणि लिंबू देखील वापरू शकता. 5 चमचे साखर आणि त्यात 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध मिसळा. हे मिश्रण गरम करा. लगेच नॅचरल वॅक्स तयार होतं. हे मिश्रण लावण्याआधी अंगावर थोडी पावडर लावा. त्यानंतर हे मिश्रण लावा. आता वॅक्सिंग _स्ट्रिप_च्या मदतीने,केसांना उलट्या दिशेने खेचा. शरीराचे केस सहज निघतील. ( आवडीने खाताय केक?; माहिती आहे ना?; अंड, साखर एकत्र घेतल्यास होतात Side Effect ) ओट मील आणि केळ****ं 1 कप ओट मील आणि केळं मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट बनवा. ती शरीरावरच्या केसांना लावा. 15 मिनिटांनंतर सुकल्यावर चोळून काढा आणि पाण्याने धुवा.हे एक नॅचरल स्क्रब आहे, त्यामुळे अनावश्यक केसही निघून जातात.