JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / 2 मुलांच्या जन्मात 'इतकं' असावं अंतर; दुसऱ्या प्रेग्नेन्सीचा विचार करण्याआधी वाचा

2 मुलांच्या जन्मात 'इतकं' असावं अंतर; दुसऱ्या प्रेग्नेन्सीचा विचार करण्याआधी वाचा

दोन मुलांमध्ये नेमकं किती अंतर असावं हा प्रत्येक पालकाचा निर्णय असतो. पण, दोन मुलांमध्ये वयाचं जास्त अंतर असण्याचे फायदे आणि तोटे देखील असतात.

019

ज्या पालकांना एकापेक्षा जास्त मुलं हवी आहेत अशा पालकांना अनेक अनुभवांमधून जावं लागतं. दोन मुलांमध्ये जास्त अंतर नसावं अशी पालकांची भूमिका असते. कारण त्यामुळे मुलांचं संगोपन करणं सोपं जातं शिवाय लहान मुलं एकमेकांना सांभाळून घेतात.

जाहिरात
029

दोन मुलांमध्ये नेमकं किती अंतर असावं हा प्रत्येक पालकाचा निर्णय असतो. पण. दोन मुलांमध्ये वयाचं जास्त अंतर असण्याचे फायदे आणि तोटे देखील असतात.

जाहिरात
039

आई वडिलांचं वय कमी असेल आणि त्यांना लवकरात लवकर मुलं जन्माला घालायची असतील तर, अशा वेळेस गर्भधारणेच्या काळात जास्त काळजी घ्यावी. याशिवाय पहिल्या बाळाच्या जन्मानंतर दुसऱ्या मुलाचा विचार करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 2018 सालच्या एका अभ्यासानुसार दोन प्रेग्नेन्सी दरम्यान 12 महिन्यांपेक्षा कमी अंतर असल्यामुळे महिलेला जास्त त्रास होतो. कधीकधी डिलिव्हरी दरम्यान जीवावरही बेतू शकतं.

जाहिरात
049

संशोधनानुसार पहिल्या बाळानंतर दुसऱ्या प्रेग्नेंसीमध्ये किमान 18 महिन्यांचं अंतर असायला हवं. हेल्थ एक्सपर्ट सुद्धा हाच सल्ला देतात. त्यांच्यामते किमान 18 ते 24 महिन्यांचं अंतर दुसऱ्या प्रेग्नेंसीमध्ये असायला हवं. कमी काळात दुसरी प्रेग्नेंसी झाली तर, बाळाच्या वाढीवर आणि वजनवर परिणाम होतो.

जाहिरात
059

ज्या महिलेचं सिझेरियन झालेला आहे. अशा महिलांनी दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करताना घाई करू नये. प्रेग्नेंसी मध्ये गॅप नसेल तर, टाके तुटण्याची शक्यता असते. गर्भधारणेच्या काळात अतिताणामुळे देखील हे टाके तुटू शकतात.

जाहिरात
069

दुसरी गर्भधारणा लवकर झाल्यास आईच्या वजनावर याचा परिणाम होतो. शिवाय शरीरामध्ये आवश्यक पोषक घटक नसतात. महिलेच्या मानसिक स्थितीवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.

जाहिरात
079

डॉक्टरांच्या मते दोन मुलांमध्ये किती अंतर असावं हे पालकांच्या वयाप्रमाणे त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर देखील अवलंबून असतं. 18 महिन्याचं अंतर नसेल तर, पहिलं मूल देखील दुसऱ्या मुलाच्या जन्मावेळी लहान असतं. अशा वेळेस दोन्ही मुलांना सांभाळणं आव्हानात्मक ठरू शकतं. त्यामुळे बाळाच्या जन्माबरोबर संगोपनामध्ये देखील अडचणी येऊ शकतात अशा पालकांवर अति ताण वाढू शकतो.

जाहिरात
089

याशिवाय दोन मुलांमध्ये जास्त अंतर ठेवणंही चुकीचं आहे. पहिलं बाळ सहा वर्षांचं झाल्यानंतर दुसऱ्या बाळाचा जन्म झाला तर, त्यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी राहत नाही. त्यामुळेच दोन मुलांमध्ये कमीतकमी तीन वर्षांचं अंतर असावं म्हणजेच पहिल्या बाळाला समज आलेली असते आणि दुसऱ्या बाळाच्या वाढी करता वेळही मिळतो.

जाहिरात
099

तज्ञांच्या मते सामाजिक दबावामुळे दुसऱ्या बाळाच्या जन्माचा निर्णय घेऊ नये. बऱ्याच वेळा पहिल्या बाळानंतर दुसऱ्या बाळाची विचारणा होऊ लागते त्यामुळे दबावाखाली पालक दुसऱ्या बाळाच्या जन्माचा विचार करतात. पण त्याआधी आपली मानसिक, आर्थिक आणि शारीरिक परिस्थिती याचाही विचार करावा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या