JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / घरात झाला उंदरांचा सुळसुळाट; ‘या’ 5 उपायांनी करा बंदोबस्त

घरात झाला उंदरांचा सुळसुळाट; ‘या’ 5 उपायांनी करा बंदोबस्त

घरात उंदीर (Rats) वाढले तर, सगळ्या घराची वाट लागते. घरातले पद्रार्थ, कपडे, प्लास्टीकच्या वस्तू उंदीर कुरतडून खराब (Damaged) करतात.

0107

घरात उंदीर वाढले तर, घरातल्या वस्तू खराब करतात, नासधूस करतात. भितींही पोखरतात शिवाय आजारांनाही कारणीभूत ठरतात. उंदरांना घरामधून पळवून लावणं हाच एकमेक उपाय त्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी उपयोगी ठरतो.

जाहिरात
0207

उंदरांसाठी पुदिन्याचं तेल वापरता येऊ शकतं. पुदिन्याच्या तेलात बरेच औषधी गुणधर्म असतात. याचा वापर उंदरांना पळवण्यासाठीही करू शकता.

जाहिरात
0307

पुदिना तेलाला अतिशय तीव्र वास असतो. त्यामुळे उंदीर पळून जातात. यासाठी कापसाच्या बोळ्यावर पुदिन्याचं तेल लावून त्यांच्या बिळाजवळ ठेवा किंवा ज्या ठिकाणी उंदीर येतात तिथे सोडा, उंदीर पळतील.

जाहिरात
0407

गाईचं शेणही वापरू शकता. उंदरांमुळे हैराण झाले असाल तर, गायीचं शेण उंदरांच्या बिळाजवळ ठेवा.

जाहिरात
0507

उंदरांना कांद्याचा वास सहन होत नाही. त्यामुळे उंदीर येण्याच्या ठिकाणी किंवा बिळाजवळ कांदे कापून ठेवा.

जाहिरात
0607

उंदरांना पळवण्यासाठी मांजर पाळा. आवडत असेल तर, घरात मांजर पाळू शकता. मांजरीच्या आवाजाला घाबरून उंदीर पळून जातील.

जाहिरात
0707

लाल मिरचीची पावडर उंदीर पळवण्यासाठी वापरू शकता. हा अगदी सोपा उपाय आहे. मिरची पावडर किंवा सुकलेल्या लाल मिरच्या उंदरांच्या बिळाजवळ ठेवा उंदीर बाहेरच येणार नाहीत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या