JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Photo पाहून म्हणाल So cute! देशातील पहिली ‘मांजरांची बाग’, गुण्यागोविंदानं राहतात 300 मांजरं

Photo पाहून म्हणाल So cute! देशातील पहिली ‘मांजरांची बाग’, गुण्यागोविंदानं राहतात 300 मांजरं

गुजरातमधील (Gujrat) एक अवलियानं मांजर बागेची (Cat Garden) निर्मिती केलीय. आपली देवाघरी गेलेली बहिण (Sister) मांजरीच्या रुपानं परत आल्याच्या भावनेतून त्यानं मांजरांसाठी स्वतंत्र जागा विकत घेऊन ही बाग तयार केली आहे. या बागेत वेगवेगळ्या जातीची 200 मांजरं असून त्यातील 28 पर्शियन मांजरी आहेत. या मांजरींसोबत 6 कुत्रेदेखील राहतात.

0108

कच्छमध्ये राहणाऱ्या उपेद्र गोस्वामी यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी एक मांजर आलं. आपली दिवंगत बहिणच मांजरीच्या रुपात परत आल्याचं त्यांना वाटलं आणि त्यांनी माजरांसोबत राहायला सुरुवात केली.

जाहिरात
0208

या बागेच्या देखभालीसाठी त्यांना दरमहा 1.5 लाख रुपयांचा खर्च येतो. गोस्वामी आणि त्यांची पत्नी पूजा दोघेही या मांजरींची देखभाल करतात.

जाहिरात
0308

मांजरप्रेमींसाठी ही बाग दर रविवारी खुली असते. आजूबाजूच्या भागातील मांजरप्रेमी या बागेला भेट देतात.

जाहिरात
0408

या भागात येणारे पर्यटकदेखील आता या बागेत येतात आणि मांजरींसोबत फोटो काढून घेतात.

जाहिरात
0508

या बागेत आपल्या खेळण्याची आणि झोपण्याची जागा मांजरांनी स्वतःच निश्चित केली आहे.

जाहिरात
0608

शाळेच्या मुख्याध्यापिका असणाऱ्या पूजा पहाटे पाच वाजता उठून सर्व माजरांना नाश्ता देतात. त्यानंतर दुपारी दीड वाजता शाळेतून परत आल्यावर त्यांना जेवण देतात.

जाहिरात
0708

पिलांना जन्म देण्याची जागादेखील मांजरांनी ठरवून घेतली असून सर्व मांजर त्याच ठिकाणी पिलांना जन्म देतात.

जाहिरात
0808

सर्व मांजरांसाठी वातानुकुलीत व्यवस्था करण्यात आली असून त्यांची पूर्ण काळजी या बागेत घेतली जाते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या