JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / पैसे जमवून जमवून लोकांनीच उभारला आपला नवा 'देश'; तुम्हीही होऊ शकता इथले नागरिक कसं ते पाहा

पैसे जमवून जमवून लोकांनीच उभारला आपला नवा 'देश'; तुम्हीही होऊ शकता इथले नागरिक कसं ते पाहा

या देशासाठी गुंतवणूक करून तुम्ही देशाचा एक हिस्सा खरेदी करू शकता, शिवाय या देशाचे नागरिकही होऊ शकता.

019

तुम्ही आतापर्यंत एखादी जमीन खरेदी केली असेल, शेत खरेदी केलं असेल किंवा एखादं घर खरेदी केलं आहे. किंवा जमीन खरेदी करून त्यावर घर बांधलं आहे. पण कधी संपूर्ण देश खरेदी केल्याचं किंवा देश उभारल्याचं ऐकलं आहे का?  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/letsbuyisland)

जाहिरात
029

काही लोक मिळून देश उभारण्याचं स्वप्नं प्रत्यक्षात साकार करत आहेत. क्राऊडफंडिंग म्हणजे लोकांमार्फत पैसे जमवून नवा देश उभारण्याचं स्वप्नं साकार होत आहे.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/letsbuyisland)

जाहिरात
039

सीएनएनच्या रिपोर्टनुसार  काही लोकांनी मिळून एक आयलँड खरेदी केलं आणि आता हे आयलँड एक नवा देश होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा करण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/letsbuyisland)

जाहिरात
049

15 वर्षांपूर्वी गॅरेथ जॉनसनला  क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आयलँड खरेदी करण्याची कल्पना सुचली. त्याने मार्शल मेअर या मित्रासोबत 2018 साली लेट्स बाय एन आइलँड अशी मोहीम त्यांनी सुरू केली.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/letsbuyisland)

जाहिरात
059

त्यांनी वर्षभरातच म्हणजे 2019 साली क्राऊडफंडिंगच्या  माध्यमातून तब्बल 2.5 कोटी रुपये जमवले आणि  केलं. अमेरिकेच्या कॅरेबिअनमधील बेलिजजवळ असलेलं 1.2 एकरचं कॉफी काये (Coffee Caye) खरेदी केलं.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/letsbuyisland)

जाहिरात
069

हे आयलँड खरेदी करून त्यांनी त्याला फक्त पर्यटनस्थळ नव्हे तर एक नवा देश बनवण्याचं स्वप्न पाहिलं.  या आयलँडला देश म्हणून आंततराष्ट्रीय संघटनाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही, त्यामुळे या मायक्रोनेशन म्हटलं जात आहे.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/letsbuyisland)

जाहिरात
079

या मायक्रोनेशनचं नाव प्रिन्सिपॅलिटी ऑफ आयलँडिया (Principality of Islandia) ठेवण्यात आलं आहे. या देशाचा स्वतंत्र ध्वज, राष्ट्रगीत, सरकार आणि सिक्रेट पोलीसही आहे.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/letsbuyisland)

जाहिरात
089

letsbuyanisland.com या वेबसाईटवर आयलँड खरेदी मोहिमेत तुम्ही पैसे गुंतवू शकता, या आयलँडचा एखादा भाग खरेदी करू शकता आणि या मायक्रोनेशनचे नागरिकही होऊ शकता. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/letsbuyisland)  

जाहिरात
099

14 मार्च, 2022 पर्यंत 103 गुंतवणूकदारांनी या आयलँडमध्ये पैसे गुंतवले आहेत तर 350 लोक या देशाचे नागरिक झाले आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/letsbuyisland)  

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या