JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / कोल्हापूर / आधी पत्नी, 2 वर्षांनी प्रेयसी; साताऱ्यातील सीरियल किलर नितीन गोळे प्रकरणाचं भयावह रुप

आधी पत्नी, 2 वर्षांनी प्रेयसी; साताऱ्यातील सीरियल किलर नितीन गोळे प्रकरणाचं भयावह रुप

दोन वर्षांपूर्वी पुरलेल्या मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढण्यात आला असून अद्याप आरोपीची चौकशी सुरू आहे.

0106

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात डॉक्टर संतोष पोळ हत्याकांडानंतर अजून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. ज्या पद्धतीने डॉक्टर पोळने अनेक खून केले होते, तशाच पद्धतीने नितीन गोळे या आरोपीने 2019 मध्ये एक आणि आता 3 ऑगस्ट रोजी असे दोन खून केल्याचे समोर आले आहे.

जाहिरात
0206

3 ऑगस्ट रोजी प्रेयसी संध्या शिंदे हिचा खून करून नितीन गोळे याने तिचा मृतदेह शेतात लपावल्याचं समोर आलं आहे. नितीनने महिलेवर संशय व्यक्त करीत तिची गळा दाबून हत्या केली.

जाहिरात
0306

भुईंज पोलिसांनी त्याच्या प्रेयसीच्या मृतदेहाचा उलघडा लावल्यानंतर पोलीस तपासात 2019 मध्ये नितीन गोळे याने पत्नी मनीषा गोळे हिचादेखील खून करून मृतदेह शेताच्या एका बाजूला असलेल्या ओढ्यात पुरला असल्याचे समोर आले आहे.

जाहिरात
0406

सध्या येथे खोदकाम करून पुरलेल्या मृतदेहाचा सांगाडा काढण्याचे काम सुरू आहे.

जाहिरात
0506

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतातील ओढ्यात एक मृतदेह पुरण्यात आला होता. महिलेच्या मृतदेहाचे सांगाडे बाहेर काढण्यात आले आहे.

जाहिरात
0606

सध्या तरी दोन खुनाची कबुली या आरोपीने दिली अजून काही खून केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या