JOIN US
मराठी बातम्या / भारत-चीन / निषेध चीनचा, पुतळा जाळला पाहा कुणाचा! अतिउत्साही कार्यकर्त्यांचं ज्ञान उघड

निषेध चीनचा, पुतळा जाळला पाहा कुणाचा! अतिउत्साही कार्यकर्त्यांचं ज्ञान उघड

लडाखमधील भारत-चीन चकमकीनंतर देशभरात चीनविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कलकत्ता, 18 जून : लडाखमधील भारत-चीन चकमकीनंतर देशभरात चीनविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी रॅली काढून चिनी वस्तूंचा वापर करू नये, असं आवाहन केलं जात आहे. त्यातचं एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील एका गावातील आहे. यामध्ये भारत-चीन तणावाबाबत भाजप कार्यकर्त्यांनी चीनविरोधात निषेध रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीमध्ये मात्र एक विचित्र प्रकार समोर आला आहे. चीनविरोधात आयोजित केलेल्या रॅलीमध्ये उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. बहुतेक चीनचे पंतप्रधान कोण, याबाबत भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. ते अख्ख्या रॅलीमध्ये चीनविरोधात घोषणा देत आहेत.

यामध्ये एक भाजप कार्यकर्ता म्हणाला की, आम्ही लडाखमध्ये झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो. त्यासाठी आम्ही रॅलीचं आयोजन केलं आहे. यासाठी चीनचा प्रधानमंत्री किम जोंग उन यांचा पुतळा जाळणार आहोत

या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स पाहायला मिळत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना चीनचे पंतप्रधान कोण याचीही माहिती नसल्याचे त्यांची खिल्ली उडवली जात आहे. भारत चीन सीमेवर लडाखमधल्या गलवान खोऱ्यात परवा रात्रीपासून सुरू असलेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. चीनच्या बाजूचंही या हिंसक वादात नुकसान झालं आहे. जिवाची बाजी लावून चीनची घुसखोरी आणि उद्दामपणा परतवून लावणाऱ्या भारतीय जवानांना सॅल्यूट केलं जात आहे. हे वाचा- घरात लग्नाची तयारी होती सुरू; त्यापूर्वीच चीनविरोधात लढताना जवानाला आलं वीरमरण संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या