JOIN US
मराठी बातम्या / भारत-चीन / सॅल्यूट! चीनसोबत LAC वर तणाव असताना भारतीय सैन्याने दाखवली माणुसकी; 3 चिनी नागरिकांचा वाचवला जीव

सॅल्यूट! चीनसोबत LAC वर तणाव असताना भारतीय सैन्याने दाखवली माणुसकी; 3 चिनी नागरिकांचा वाचवला जीव

गेल्या काही महिन्यात दोन वेळी भारतीय सैन्य व चिनी सैन्य आमनेसामने आले, असे असतानाही भारतीय सैन्याने माणुसकी जपत चिनी नागरिकांना मदत केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : भारत आणि चीनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) तणाव सुरू आहे. सांगितले जात आहे की गेल्या 4 महिन्यांपासून दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे आहे. यादरम्यान दोन वेळा दोन्ही सैन्यांमध्ये चकमक झाली आहे. मात्र असे असतानाही भारतीय सैन्याने माणुसकीचा नवा आदर्श पुढे ठेवला आहे. चीनसोबत शत्रूत्व असतानाही भारतीय सेैन्य (Indian Army) गरज पडल्यास चीनच्या नागरिकांना (  Chinese citizens) मदत करण्यासाठीही मागेपुढे पाहत नाहीत. अशीच एक घटना सिक्कीममध्ये झाली आहे. येथे वातावरण खराब असल्याने 3 चिनी नागरिक रस्ता हरवले होते. अशाच भारतीय सैन्यानेन त्यांनी अशा कठीण प्रसंगात मदत केली. त्यांच्यावर भारतात उपचार केले आणि त्यांना सुखरुप चीनला पाठवले.

चिनी नागरिकांचा वाचवला जीव सैन्याने दिलेल्या माहितीनुसार चीनचे तीन नागरिक नॉर्थ सिक्कीममधील प्लाटू भागात 3 सप्टेंबर रोजी रस्ता भटकले होते. हा परिसर शून्य तापमानात 17500 फूट उंचावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे एक महिला आणि दोन पुरुषांना बर्फामध्ये रस्ता सापडत नव्हता. अशात त्यांची परिस्थिती पाहता तातडीने कारवाई करीत त्या सैन्यांचा जीव वाचविण्यात आला. भारतीय सैन्याने चिनी नागरिकांना अन्न, पाणी, ऑक्सीजन, गरम कपडे आणि औषधं दिली. त्यानंतर सैन्याने त्या चिनी नागरिकांना योग्य रस्ता दाखवित त्यांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचविण्यासाठी मदत केली. सैन्याने याबाबत ट्विट करीत लिहिले आहे, मानवता सर्वोपरि.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या