लडाख, 08 सप्टेंबर : मागच्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणावाग्रस्त स्थिती आहे. 29 आणि 30 ऑगस्टला रात्री चीननं पँगोग त्सो इथे घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय जवानांनी तो हाणून पाडल्यानंतर पुन्हा एकदा 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर गोळीबार झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा पँगोंग त्सोवर रेषेजवळ (LAC) भारती-चिनी सैनिकांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनच्या सरकारी मीडिया ‘ग्लोबल टाइम्स’ ने भारतीय सैनिकांवर पँगोंग त्सोच्या दक्षिणेकडील गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. सैनातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुजोर चीनच्या बाजूने सुरुवातीला भारतीय हद्दीत गोळीबार करण्यात आला, त्यानंतर जवानांनी चोख प्रत्युत्तर देत कारवाई केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात आहे.
चिनी संरक्षण मंत्रालय, चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे वेस्टर्न पीपल्स कमांड, कर्नल झांग शुली यांनी LACजवळील स्थितीबाबत एक निवेदन जारी केलं. या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की ‘चिथावणीखोरी’ भारतीय सैनिकांच्या बाजून गोळीबार करण्यात आल्यानं चिनी सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.
हे वाचा- चीनच्या तब्बल 7.3 लाख कोटींवर पाणी; सीमेवरील वादानंतर भारताचा ड्रॅगनला झटका गलव्हान खोऱ्यानंतर लडाखमध्ये 29 ऑगस्टला रात्री उशिरा पँगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य भिडले होते. चीननं भारतीय सीमांमध्ये पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून भारतीय सैन्यातील जवानांनी ड्रॅगनचा हा डाव उधळून लावला होतता. त्याचवेळी भारतीय सैन्याला सर्वात उंच असणारी टेकडी Strategic heightवर कब्जा मिळवण्यात यश आलं. त्यानंतर भारतीय सैन्यदल अधिक अलर्टवर होतं. चीनच्या प्रत्येक बारीक हालचालींवर भारताची नजर होतीच. सोमवारी रात्री पुन्हा एकदा चिनी सैनिक आणि भारतीय सैनिकांमध्ये गोळीबार झाला. यामुळे LACवर सध्या तणावाचं वातावरण आहे. LACवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी वारंवार बैठकांऱ्या फेऱ्या होत असून त्यातून तोडगा मात्र निघत नसल्याचं पाहायला मिळत आहे.