JOIN US
मराठी बातम्या / भारत-चीन / ड्रॅगनच्या कुरघोडीवर संरक्षण मंत्रालयाचा खुलासा, तर जम्मूमध्ये उतरले फायटर हेलिकॉप्टर

ड्रॅगनच्या कुरघोडीवर संरक्षण मंत्रालयाचा खुलासा, तर जम्मूमध्ये उतरले फायटर हेलिकॉप्टर

भारत-चीन सीमारेषेपासून किश्तवाड 210 किमी दूर आहे. पाडर परिसर ओलांडून हेलिकॉप्टर लडाखला जाऊ शकतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लडाख, 08 सप्टेंबर : भारत-चीन लडाखमधील सीमारेषेवर तणाव निवळण्याचं नाव घेत नाही. ऑगस्टमध्ये दोन दिवस घुसखोरीच्या प्रकारानंतर पुन्हा एकदा सोमवारी चीन आणि भारतीय सैनिकांकडून गोळीबार झाला. हा गोळीबार सुरुवातील भारतीय जवानांनी सुरू केल्याचा आरोपी चीननं केला होता. ग्लोबल टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार भारतीय सैन्यदलाकडून गोळीबार करण्यात आला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननंही गोळीबार सुरू केला असा दावा चीनच्या राष्ट्रध्यक्ष आणि सैन्य दलाकडून कऱण्यात आला आहे. मात्र चीनच्या आरोपाचं खंडन संरक्षण मंत्र्यांनी केल्याची माहिती मिळाली आहे. LAC वरी भारतीय सैन्यानं नाही तर सुरुवातील चीनच्या सैनिकांनी गोळीबार केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांकडून मिळाली आहे. भारतीय सेनेनं चीनचा डाव उधळून लावला वारंवार चीनकडून कुरापती होत असताना जवानांनी करडी नजर ठेवून चीनची खेळी हाणून पाडल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

दुसरीकडे भारतीय सैन्याचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष आहे. त्यामुळे सैन्यदल हाय अलर्टवर असल्याची माहिती मिळाली आहे. भारत-चीन सीमारेषेवर वाढता तणाव लक्षात घेता जम्मू इथल्या किश्तवाडमध्ये अपाचे फायटर हेलिकॉप्टर उतरले आहेत. हे वाचा- 45 वर्षांनंतर LACवर गोळीबार, भारतीय जवानांनी घुसखोरी करणाऱ्या चीनला मागे परतवलं

हे वाचा- चीनसोबत तणाव असताना भारतीय सैन्याने दाखवली माणुसकी; 3 चिनी नागरिकांचा वाचवला जीव भारत-चीन सीमारेषेपासून किश्तवाड 210 किमी दूर आहे. पाडर परिसर ओलांडून हेलिकॉप्टर लडाखला जाऊ शकतं. लडाखमधील नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैन्याच्या वाढत्या कुरापतींमुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. सोमवारी किश्तवाडमध्ये प्रथमच फाइटर अपाचे हेलिकॉप्टर उतरले. त्या भागाच्या हेलिपॅडवर दोन अपाचे हेलिकॉप्टर उतरल्यानंतर वैमानिकांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. या हेलिकॉप्टरच्या मदतीनं एकावेळी 14 मिसाईल सोडता येऊ शकतात याशिवाय सलग 5 तास हे हेलिकॉप्टर काम करू शकतं इतकी याची ताकद असल्यानं भारतीय सैन्य आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या