नवी दिल्ली, 22 जुलै : लिबरेशन आर्मी (PLA) अद्यापही एलएसीवरील परिस्थिती सुधारत नसल्याचे दिसून येत आहे. ते अजूनही मोठ्या संख्येने सैन्य लडाखच्या पूर्वेकडी भागात तैनात करीत आहेत. अशा प्रकारे त्यांनी 40000 सैन्य येथे तैनात केले आहेत. त्यामुळे अनेक बैठकांनंतरही लडाखच्या पूर्व भागातील परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. 14 जुलै रोजी दोन्ही देशांमध्ये कोर कमांडर स्तरावरील बैठकीनंतरही चिनी सैनिक त्या जागेवरुन जराही मागे हटलेले नाहीत. या बैठकीत मागे हटण्यावरुनच चर्चा झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 9 जुलैनंतर कोणतीही हालचाल झालेली नाही आणि चिनी सैनिक जेथे होते तेथेच तैनात आहेत. दोन आठवड्यांचा अवधी वाद संपविण्यासाठी पहिल्या फेजमध्ये डिसएन्गेजमेटंच्या काळात गलवान भागात पीपी-14 आणि पीपी-15 मध्ये पूर्णपणे डिसएन्गेजमेटं झालं होतं. दोन्ही देशांचे सैनिक जवळपास 1 ते दीड किमी मागे गेले होते. तेथे बफर झोन तयार केला होता. जेणेकरुन दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर येऊ नये. हॉट स्प्रिंग भागात डिसएन्गेजमेंट पूर्ण होऊ शकले नाही आणि येथे चिनी सैनिक ठरविलेल्या चर्चेनुसार मागे हटले नाहीत. पँगोग भागात फिंगर-4 हून चिनी सैनिक 9 जुलै रोजी फिंगर-5 पर्यंत पोहोचले होते. हे वाचा-
href=“https://lokmat.news18.com/india-china/the-indian-air-force-tightened-its-belt-against-china-5-rafel-will-deploy-fighter-jets-mhmg-465633.html">चीनविरोधात भारतीय वायुसेना आक्रमक; 5 राफेल लढाऊ विमानं करणार तैनात अजूनही 1 आठवड्यांची प्रतीक्षा 14 जुलै रोजी चिनी सैन्य फिंगर-4 ची मागे जाणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही चिनी सैन्य मागे हटलेलं नाही आणि तेथेच तैनात आहेत. आर्मीच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की बैठकीत यासाठी 2 आठवड्यांचा अवधी दिला होता. आता केवळ 1 आठवडा झाला आहे. पहिल्या फेजचे डिसएन्गेजमेंटमध्येही चिनी सैन्य शेवटच्या काही दिवसांत मागे गेले होते. त्यामुळे या आठवड्यात चीनच्या हालचाली संपलीत अशी आशा आहे.