द्वारे: श्रुती भट/ 13 ऑगस्ट 2021 खेड्यापाड्यांतून रुजलेला लसीकरणाविषयीचा संकोच दूर करण्यासाठी UP(उत्तर प्रदेश) सरकारने नुकतीच Network18 व Federal Bank यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या Sanjeevani-A Shot of Life( संजीवनी- अ शॉट ऑफ लाईफ) या लसीकरण जनजागृती मोहिमेशी हातमिळवणी केली आहे. भारतातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होऊन याचे कार्य वाढवण्याचे आणि राज्यामध्ये 100% लसीकरण करण्याचे योगी सरकारचे उद्दिष्ट आहे. कोविड-19 ची प्रकरणे वाढू लागली आहेत आणि तिसऱ्या लाटेची भीती सतावत आहे, विविध राज्यांमधील सरकारे सार्वजनिक लसीकरणाला अधिक वेग देत आहेत. लसीकरण मोहिमेत उत्तर प्रदेश आधीच इतर राज्यांपेक्षा अग्रेसर आहे आणि त्याने अलीकडेच 5.50 कोटींपेक्षा जास्त डोस वितरीत करून आणि 5,51,27,657 लोकांना लसीकरण करून एक मैलाचा दगड पार केला आहे. ही आकडेवारी प्रभावी असली तरीही या राज्यातील ग्रामीण लोकसंख्येचा बराचसा भाग हा लसीविषयीच्या दंतकथा आणि गैरसमज यांमुळे लस घेण्यासाठी राजी होत नाही. Sanjeevani शी केलेल्या या भागीदारीच्या माध्यमातून हे राज्य सरकार ग्रामीण भागातील लोकांना लस घेण्यासाठी जनजागृती करून त्यांना प्रवृत्त करण्यासाठी आपला आवाका वाढवत आहे. लस घेण्याविषयी जनजागृती करून त्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने 7 एप्रिल 2021 रोजी अत्तारी बॉर्डर, अमृतसर येथे Sanjeevani चे उद्घाटन झाले. याच्या लसीविषयीचा संकोच मुळापासून उखडून टाकण्याच्या प्रयत्नांमधून सुरू झालेल्या ‘Sanjeevani Gaadi’ ने कोविड-19 चा सर्वाधिक प्रभाव असलेल्या पाच जिल्ह्यांमधील अनेक गावांमधून प्रवास केला. अत्तारीपासून ते दक्षिण कन्नडपर्यंत लसीकरणाची ही मोहीम मार्गावर आणताना ही गाडी 500 पेक्षा अधिक गावांमध्ये पोहचली. घरोघरी जाऊन संवाद साधने, 24/7 व्हॉट्सअॅप व चॅट सहाय्य यांच्या माध्यमातून लसीकरणाविषयीची जनजागृती अंतिम टप्प्यापर्यंत नेण्यामध्ये या मोहिमेचा सिंहाचा वाटा आहे. जनजागृती करून आणि कोविड-19 लसीसंबंधीचे गैरसमज दूर करून ही युती (UP) उत्तर प्रदेशमधील सध्याच्या आक्रमक लसीकरण उपक्रमाला आणखी चालना देईल.