JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / थंडीच्या मोसमात 'खा' हे पदार्थ

थंडीच्या मोसमात 'खा' हे पदार्थ

थंडीच्या दिवसांमध्ये आपलं शरीर आतून गरम ठेवणंही खूप गरजेचं आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आजारांपासून बचावासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.

जाहिरात

winter special healthy food items

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 नोव्हेंबर : हिवाळा आलाय आणि गुलाबी थंडी वाढू लागली आहे. थंडीची सुरुवात झाली की कपाटात ठेवलेले उबदार कपडे आणि ब्लँकेट बाहेर काढायला सुरुवात होते. शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी आपण अनेक दिवस आधीच तयारी सुरू करतो. पण थंडीच्या दिवसांमध्ये आपलं शरीर आतून गरम ठेवणंही खूप गरजेचं आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आजारांपासून बचावासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. कोणते पदार्थ हिवाळ्यात शरीरात उष्णता निर्माण करतात, ते जाणून घेऊयात. या संदर्भात ‘एबीपी लाइव्ह’ने वृत्त दिलंय. मध हिवाळ्यात मधाचं सेवन केल्याने आपलं शरीर गरम राहतं आणि रोगप्रतिकारकशक्तीदेखील वाढते. थंडीमध्ये रोज एक चमचा मधाचं सेवन करा. याची सर्दी, खोकला, ताप इत्यादीपासून बचावास मदत होईल. आलं हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवण्यासाठी आलं हे उत्तम औषध आहे. चहापासून ते जेवणापर्यंत अनेक पेय-पदार्थांत तुम्ही आलं घालू शकता. आलं आपलं शरीर उष्ण ठेवतंच, तसंच त्यातील अँटिऑक्सिडंट आणि अँटि-इन्फ्लेमेट्री गुणधर्म आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे आपला इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. हेही वाचा - Peanut Benefits : फक्त बदामच नाही शेंगदाणेही वाढवतात स्मरणशक्ती; रोज इतक्या प्रमाणात खा गूळ थंडीच्या काळात गुळाचं सेवन करणंही फायदेशीर ठरतं. गुळामध्ये भरपूर कॅलरीज असतात. तुम्ही गुळाचा चहा घेऊ शकता किंवा दुधासोबत गूळ खाऊ शकता. डोंगराळ भागातील लोक हिवाळ्यात गुळाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अंडी अंडी हा प्रोटिनचा चांगला स्रोत मानला जातो. हिवाळ्यात दररोज दोन अंडी खाऊन तुम्ही तुमची प्रोटिनची गरज पूर्ण करू शकता. हेल्थ एक्सपर्टच्या मते, दररोज सकाळी नाश्त्यामध्ये अंड्यांचा समावेश करणं फायद्याचं आहे. कारण, यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. अंड्याचं सेवन डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरतं.

दूध दूध पिणं प्रत्येक ऋतूत फायदेशीर असलं तरीही थंडीमध्ये गरम दूध पिणं अधिक चांगलं असतं. दुधामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12, प्रोटिन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतं. सूप हिवाळ्यात सूप हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही सूपमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या घालून ते बनवू शकता. सूप आपल्या शरीरातील हाडं मजबूत करतं आणि थंडीमुळे होणार्‍या समस्यांपासून आपला बचाव करतं. याशिवाय शरीराला गरम ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, कॉफी, केळी, ड्रायफ्रूट, रताळं, नॉनव्हेजचा आहारात समावेश करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या