JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / जेवणानंतर खाता 'ही' फळं, होऊ शकतो त्रास; वाचा सविस्तर जेवणानंतर नेमकी कोणती खावी फळं

जेवणानंतर खाता 'ही' फळं, होऊ शकतो त्रास; वाचा सविस्तर जेवणानंतर नेमकी कोणती खावी फळं

Healthy Life Tips: फळं (Fruits) खायची कुठली वेळ योग्य असं जर तुम्हाला आम्ही विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्याल? कुठलीही वेळ. पण तसं नाही आयुर्वेदात फळं कधी खावीत आणि कधी खाऊ नयेत हेही सांगितलं आहे.

जाहिरात

कापलेली फळं उरली असतील तर, आपण त्यांना फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण, प्रत्येक फळ ठराविक काळ टिकू शकतात. त्यानंतर त्यातील पोषक घटक संपू लागतात. त्यामुळे अगदी रात्रभर फ्रिजमध्ये राहिलेलं फळ खाऊ नयेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जुलै:  पौष्टिक आहार घेणं हे निरोगी (Healthy Life) आयुष्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं. भारतात घरात केलेले पदार्थ खाण्यावर लोक आधी भर द्यायचे. आता फास्ट फूडच्या (Fast Food) जमान्यात बाहेरचे पदार्थ खाण्याकडेच सगळ्यांचा कल वाढला आहे. इन्स्टंट पदार्थ सहज उपलब्ध असल्याने लोक त्यांना प्राधान्य देतात. पण वैद्यकीय शास्रानुसार शरीराला आवश्यक असलेले घटक मिळावे असा आहार घ्यावा असं सांगितलं जातं. भारतात आयुर्वेदशास्रात याबद्दल महत्त्वाची सूत्रं सांगितली आहेत. त्या सूत्रांतून तयार झाली औषधं किंवा खाण्या-पिण्याच्या पद्धती आपल्या घरांतील आजी-आजोबा आपल्याला सांगत असतात. त्यापैकीच एक म्हणजे फळं (Fruits) खाणं. फळं खाणं हे चांगल्या आरोग्यासाठी हितकारक असतं. फळांमध्ये अनेक पोषक तत्त्वं असतात जी मिळाल्याने शरीराला उर्जा मिळते. फळांमुळे शरीर आणि त्वचा दोन्हींना फायदा होतो. त्यामुळे काही जण कुठल्याही वेळेला फळं खायला तयार असतात. फळं खायची कुठली वेळ योग्य असं जर तुम्हाला आम्ही विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्याल? कुठलीही वेळ. पण तसं नाही आयुर्वेदात फळं कधी खावीत आणि कधी खाऊ नयेत हेही सांगितलं आहे. आपल्यापैकी बरेच जण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर फळं खातात. अनेकांचा समज असा असतो की जेवणानंतर फळं खाल्ली की खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. पण काही फळं अशी आहेत जी जेवणानंतर लगेच खाल्ली तर ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. काही फळं तुम्ही सकाळी खाल्लीत तरच त्यांचा शरीराला अधिक फायदा होतो. ही फळं जर तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर खाल्लीत तर तुमच्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक होतो. आयुर्वेदातही असं सांगिलंय की आंबट फळं अनुषापोटी खाल्ली तर त्रास होतो. त्यामुळे पोटात काहीही नसेल तेव्हा इतर फळं खाल्ली तर चालतात पण आंबट फळं खाऊ नयेत. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर कुठल्याही प्रकारची फळं अजिबात खाऊ नयेत असं आयुर्वेदात सांगितलं आहे. आयुर्वेदानुसार जर तुम्ही जेवणानंतर फळं खाल्लीत तर तुमच्या पोटात जे अन्नपचन होत असतं त्यात अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे जेवणानंतर फळं खाऊ नयेत. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. काळजी करू नका आम्ही तुम्हाला आज स्पष्टपणे सांगणार आहोत की जेवणानंतर कोणती फळं खाऊ नयेत.

शंका बाळगू नका! प्रेग्नन्सीमध्ये Antibiotics घेतली तर नेमकं काय होतं जाणून घ्या

संबंधित बातम्या

1. आंबा आंबा हा फळांचा राजा आहे. उन्हाळ्याच्या मोसमात आंबे खाल्ले नाहीत असं होत नाही. कोकणातून हापूस, गावाकडून रायवळ, गावठी आंबे आपल्या घरी पोहोचतात आणि आपण त्यांचा फडशा पाडतो ही आपली सवय झाली आहे. पण थोडं थांबा आयुर्वेदात असं सांगितलंय की जेवणानंतर आंबा खाऊ नये. आंब्यात मोठ्या प्रमाणात साखर असते त्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वेगाने वाढतं. त्यामुळे जेवणानंतर आंबा खाऊ नये. ज्यां डायबेटिस झाला आहे अशा लोकांनी तर अजिबात जेवणानंतर आंबा खाऊ नये. खरं तर आंबा उष्ण असतो त्यामुळे जेवणापूर्वी किंवा नंतर एका तासाने आंबा खावा असं सांगितलं आहे. 2. केळं केळं हे सगळ्यांचं लाडकं फळ आहे. जसं आंबा फळांचा राजा आहे तसं केळं हे जनसामान्यांचं फळ आहे. सर्वांना परवडतं आणि सगळेच जण ते खातात. पण जर तुम्ही जेवण झाल्यावर लगेच केळं खात असाल तर थोडं थांबा. कारण जेवणानंतर केळं खाऊ नये असं आयुर्वेदात सांगितलंय. जेवणानंतर केळं खाल्लं तर शरीरातल्या कॅलरी आणि ग्लुकोजची पातळी पटकन वाढते आणि ते त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे जर तुम्ही जेवणानंतर केळं खात असाल तर तसं करू नका. हेही वाचा-  ईडीच्या कारवाईवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सविस्तर प्रतिक्रिया 3.टरबुज टरबुज दिसायला फार मोठं असतं त्यामुळे एकटी व्यक्ती खाऊ शकत नाही. त्यामुळे सगळे मिळून टरबुजाच्या सिझनमध्ये तुम्ही हे फळ खात असाल. पण जेवणानंतर खात असाल तर सावधान. टरबुज दुपारी खाणं योग्य आहे त्यामुळे तुम्ही दुपारी ते खाल्लंत तरीही चालेल पण जर रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही टरबुज खाल्लंत तर तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर टरबुज खाऊ नका. 4. द्राक्षं द्राक्षं हे लहानसं फळ आहे. स्टॉलवर हिरवी किंवा काळी द्राक्षं दिसली आणि विकत घेतली नाहीत असं होत नाही. लहान असल्यामुळे काम करता करताही फळ खाता येतं. द्राक्षं हे थंड फळ आहे त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. पण दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर द्राक्षं खाणं फारसं हिताचं नाही असं सांगितलं जातं. द्राक्ष इतरवेळी तुम्ही खाऊ शकता. 5.मोसंबी मोसंबी हे लिंबूवर्गीय फळ आहे. मोसंबीचा रस प्यायला अनेकांना आवडतं. काही जण तर मोसंबी फोडी खाणं पसंत करतात. मोसंबात ग्लुकोज असतं त्यामुळे शरीराला उर्जा मिळते. त्यामुळेच शरीर थकलं की मोसंबीचा रस दिला जातो. जुलाबामुळे शरीर गळून गेलं तर त्याला मोसंबाचा रस दिला तर त्याची शक्ती परत येते. त्यामुळे मोसंब पण दुपारच्या वेळेत खाणंच माणसाच्या हिताचं असतं. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर मोसंब खाऊ नये. 6.संत्र संत्र हे पण लिंबूवर्गीय फळ आहे. याच्या आकर्षक रंगामुळे प्रत्येकजणाला वाटतं की संत्र खाऊन बघावं. संत्राचा रस बलवर्धक असतो. संत्रामध्ये व्हिटॅमिन C चं प्रमाण मोठं असतं. त्यामुळे शरीराला उर्जा मिळते. त्यामुळे जेवणाच्या आधी एक तास किंवा जेवणानंतर एका तासाने संत्र खावं असा सल्ला आयुर्वेद देतं. आयुर्वेदात आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी अनेक उपाय आणि पद्धती सांगितल्या आहेत. त्या आपण दैनंदिन जीवनात पाळू शकलो तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या