JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / चुकूनही दह्याबरोबर खाऊ नयेत या वस्तू; होतील गंभीर परिणाम

चुकूनही दह्याबरोबर खाऊ नयेत या वस्तू; होतील गंभीर परिणाम

काही पदार्थ असे आहेत ज्यांच्याबरोबर दह्याचं कॉम्बीनेशन (Combination of curd) चवीला चांगलं वाटलं तरी आरोग्याला घातक (Dangerous to Health) असतं.

0110

दही (Yogurt) सर्वांनाच खायला आवडतं. दह्याचे विविध प्रकार तर, सगळ्यांनाच आवडतात. दही अनेक रेसिपी (Recipe) मध्येही वापरलं जातं. पण, काही पदार्थ असे आहेत ज्यांच्याबरोबर हद्याचं कॉम्बीनेशन (Combination) चवीला चांगलं वाटलं तरी आरोग्याला घातक (Dangerous to Health) असतं.

जाहिरात
0210

आयुर्वेदातही दह्याचं सेवन आरोग्यासाठी चांगलं असल्याचं सांगितलं आहे. दह्यात व्हिटॅमीन (Vitamin), प्रोटीन (Protein) आणि कॅल्शिअमही (Calcium) असतं. दह्याने पोटाच्या समस्या दुर होतात आणि पचनशक्ती सुधारते.

जाहिरात
0310

दही खाण्याचे अनेक फायदे असले तरी, काही पदार्थांबरोबर दही न खाण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात. दही आणि कांदा एकत्र खाऊ नये. आपण सॅलडमध्ये दही आणि कांदा वापरतो. पण, दही प्रकृतीने थंड आहे तर, कांदा शरीरात उष्णता निर्मण करतो. त्यामुळे ऍसिडीटी, गॅस आणि त्वचेच्या समस्याही होऊ शकतात

जाहिरात
0410

दही थंड असतं तर, आंबा उष्ण त्यामुळे आंबा आणि दही एकत्र खाल्याने शरीरात विषारी घटकांची निर्मीती होते. तर, त्वचे संबंधी समस्याही निर्माण होऊ शकतात.

जाहिरात
0510

अनेकांना दहीवडे खायला आवडतात. पण, दही आणि उडदाची डाळ एकत्र खाऊ नये असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. दही आणि उडदाची डाळ एकत्र खाण्याने गॅस, ऍसिडीटी, डायरिया सारखे त्रास होऊ शकतात.

जाहिरात
0610

दही आणि मासे हे प्रोटीनचा स्त्रोत आहेत आणि दोन प्रकारचे प्रोटीन स्त्रोत एकत्र खाऊ नयेत असं सांगितलं जातं. त्यामुळे पोटही बिघडतं, पोटदुखीची समस्याही होऊ शकते.

जाहिरात
0710

दुध प्यायल्यानंतर चुकूनही दही खाऊ नये. दुधावरील ऍसिडीक प्रक्रीयेन दही बनतं. त्यामुळे एकाचवेळी खाल्याने पोटाला पचण्यास जड ठरतं. यानेही पोटाच्या समस्या होऊ शकतात.

जाहिरात
0810

दह्यासोबत चीज खाल्ल्याने दह्यामधील जीवाणूंमुळे शरीराला चरबी पचवण्यास अडचण येते. त्यामुळे दह्यासोबत चीज खाऊ नये.

जाहिरात
0910
जाहिरात
1010

केळ आणि दही एकत्र कधीच खाऊ नये खायचं असेल तर, त्यात एक-दोन तासांचा फरक असावा. शिवाय कारलं आणि दही देखील एका दिवशी खाऊ नये.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या